रायगडात आज 1 हजार 132 रुग्णांची कोरोनावर मात

By Raigad Times    07-May-2021
Total Views |
Raigad _1  H x  
दिवसभरात 987 नवे रुग्ण; 28 मृत्यू
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यात आज (7 मे) कोरोनाच्या 987 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 1 हजार 132 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
आज पनवेल शहरात 295, पनवेल ग्रामीणमध्ये 123, अलिबागमध्ये 152, खालापूरमध्ये 71, उरणमध्ये 47, पेणमध्ये 71, महाडमध्ये 50, कर्जतमध्ये 45, रोह्यात 51, माणगावमध्ये 33, सुधागडमध्ये 22 रुग्णांची नोंद झाली आहे.
 
आजअखेर रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 14 हजार 633 झाली आहे. यापैकी 99 हजार 266 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 2 हजार 495 वर गेला आहे. सद्यस्थितीत 12 हजार 872 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (7 मे) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

Raigad _1  H x