अलिबागच्या व्यापार्‍यांकडून जिल्हा रुग्णालयाला मदतीचा हात

06 May 2021 19:17:50
Help to Civil Hospital _1
 
24 पंखे जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केले सुपूर्द
 
अलिबाग । कोरोनाच्या संकटात जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांसाठी अलिबागमधील व्यापारी उमेश मोरे, दिलीप जैन, सूरजकुमार यादव, कांतीलाल जैन यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सामाजिक बांधिलकी जपत 24 पंखे त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्याकडे सुपूर्द केले.
 
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, डॉ.अमोल भुसारे, नगरसेवक अनिल चोपडा, रवि थोरात, गणेश मांजरेकर आदी उपस्थित होते.
 
अलिबागमधील व्यापारी उमेश मोरे, दिलीप जैन, सूरजकुमार यादव, कांतीलाल जैन हे उद्योग व्यवसाय सांभाळत असताना गरजूंना मदत करण्याचे काम ते करीत आहेत. अनेकांना त्यांच्याकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. कोरोना काळातही ही सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे.
 
अलिबागमधील जिल्हा रुग्णालयासह अन्य रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांच्या मदतीसाठी पुढे येत, जिल्हा सामान्य रुग्णालयाला व्यापार्‍यांनी केलेली ही मदत निश्चितच कौतुकास पात्र आहे.
Powered By Sangraha 9.0