रायगड : ट्रकची कारला धडक; दोघांचा मृत्यू, 1 जखमी

06 May 2021 16:03:05
accident_Mumbai-pune high
 
जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दुर्घटना
 
खोपोली : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला आहे. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने खालापूर तालुक्यातील शिळफाटानजीक पटेलनगर येथे ही दुर्घटना घडली.
 
आज (6 मे) सकाळी अपघातग्रस्त ट्रक पुण्याहून मुंबईकडे सिमेंट घेऊन चालला होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिटवरुन जुन्या महामार्गाने खोपोलीकडे जात असताना, शिळफाटानजीक पटेल नगर येथील उतारावर ट्रकचे ब्रेक फेल झाले.

accident_Mumbai-pune high 
 
ही बाब लक्षात आल्यानंतर ट्रकचालकाने ट्रकमधून उडी मारली. त्यामुळे हा ट्रक समोरुन येणार्‍या कारवर धडकून पलटी झाला. ट्रकचालकाने गाडीतून उडी मारली, मात्र तो वाचू शकला नाही.
 

accident_Mumbai-pune high
 
त्याच्यासह एका पादचार्‍याचा या अपघातात मृत्यू झाला असून, ट्रकचा क्लीनर जखमी झाला आहे. मात्र त्यांची नावे समजू शकलेली नाहीत. हा अपघात इतका जोरदार होता की, यामध्ये दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे.
 
Powered By Sangraha 9.0