श्रीवर्धन : हरिहरेश्वर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी हालचाली

By Raigad Times    06-May-2021
Total Views |
Doctor_1  H x W
 
देवघर येथील जागा हस्तांतरीत करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
 
अलिबाग । श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. या केंद्राच्या इमारत बांधकामासाठी देवघर येथील जागा हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधी यांच्याकडून जारी करण्यात आले आहेत.
 
हरिहरेश्वर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर हरिहरेश्वर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील देवघर येथील गावठाण नं.1/101/अ क्षेत्र 2-24-50 हे.आर. या सरकारी खुले गावठाण मिळकतीपैकी 0-22-0 हे.आर. ही ग्रुप ग्रामपंचायत हरिहरेश्वर (देवघर) यांच्याकडून शासनाकडे पूर्नग्रहण करण्यात आली आहे.
 
ही जागा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे हरिहरेश्वर येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.