अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 147 नवे रुग्ण

By Raigad Times    06-May-2021
Total Views |
Alibag  _1  H x
 
7 रुग्णांचा मृत्यू; दिवसभरात 98 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (6 मे) कोरोनाच्या 147 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 7 रुग्ण दगावले आहेत. तर दिवसभरात 98 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात 3 हजार 321 रुग्ण उपचार घेत आहेत.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 596 झाली आहे. यापैकी 263 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 7 हजार 12 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 3 हजार 321 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 
आज (6 मे) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :

Alibag  _1  H x
Alibag  _2  H x
Alibag  _3  H x
Alibag  _4  H x
Alibag  _5  H x
Alibag  _6  H x