रायगडकरांना मिळणार घरबसल्या डॉक्टरांकडून मोफत सल्ला

05 May 2021 19:32:36
E-Sanjeevani OPD_1 &
 
  • शासनातर्फे ‘ई-संजीवनी ओपीडी’ सेवा सुरु
  • लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांचे आवाहन
अलिबाग । सध्याच्या कोरोना काळामध्ये घरी राहणे अत्यंत आवश्यक आहे. अशा स्थितीमध्ये जर कुणालाही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर? अशा लोकांना आता घरबसल्या डॉक्टरांकडून मोफत सल्ला घेता येणार आहे. याकरिता शासनातर्फे ‘ई-संजीवनी ओ.पी.डी.’ ही ऑनलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे.
 
ई-संजीवनी ओ.पी.डी. (https://esanjeevaniopd.in/) अ‍ॅपद्वारे आता डॉक्टरांसोबत मोफत सल्लामसलत करता येणार आहे. अगदी रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशीही ही सेवा उपलब्ध असणार आहे. या सेवेचा लाभ घेणार्‍या रुग्णांना एस.एम.एस.द्वारे ई-प्रिस्क्रीप्शनही प्राप्त होते. ते दाखवून रुग्ण नजीकच्या सरकारी रुग्णालयातून औषधे घेऊ शकतात.
 
ही सेवा अत्यंत लाभदायी असल्याने, जास्तीत जास्त रायगडकरांनी ‘ई-संजीवनी ओपीडी’ अ‍ॅप डाऊनलोड करुन या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे.
 
काय आहे ‘ई-संजीवनी ओ.पी.डी.’ ऑनलाईन मोफत सेवा?
  • राज्यात गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीमध्ये शासनप्रणित ‘ई-संजीवनी’ ऑनलाईन मोफत ओ.पी.डी. सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
  • याद्वारे तुम्ही घरी संजीवनी ओ.पी.डी. अ‍ॅपद्वारे डॉक्टरांसोबत मोफत सल्लामसलत करू शकता.
  • सोमवार ते रविवार सकाळी 9 ते दुपारी 1 आणि दुपारी 1:45 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये या सेवेचा लाभ घेता येईल.
  • यामध्ये एस.एम.एस.द्वारे ई-प्रिस्क्रीप्शनही रुग्णांना प्राप्त होते. ते ई-प्रिस्क्रीप्शन दाखवून रुग्ण नजीकच्या सरकारी रुग्णालयातून औषधे घेऊ शकतात.
  • सदर योजनेचा वापर करतांना लॉग इन करतांना कुणाला काहीही अडचण येत असेल तर जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथे csraigad70@gmail.com या ई मेलवर कळवावे.
‘ई-संजीवनी ओ.पी.डी.’करिता अशी करा नोंदणी...
  1. ई संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण https://esanjeevaniopd.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधू शकतात.
  2. अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईलमध्ये Google Play Store मध्ये जाऊन esanjeevani OPD National Teleconsultation Service या नावाचे अ‍ॅप (App) डाऊनलोड करता येईल.
  3. आपला मोबाईल नंबर OTP (One Time Password) द्वारे सत्यापित (Verify) करा.
  4. मोबाईल नंबर सत्यापित झाल्यानंतर टोकन (TOKEN) जनरेट करा.
  5. टोकन (TOKEN) जनरेट झाल्यावर लॉग इन करा.
  6. लॉग इन झाल्यावर तुमची माहिती भरुन तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहा व तुमचा नंबर आल्यानंतर कॉल नाऊ (Call Now) वर क्लिक करुन डॉक्टरांसोबत सल्लामसलत करा.
  7. ई प्रिस्क्रिप्शन डाऊनलोड करा.
Powered By Sangraha 9.0