धक्कादायक ! पेण येथील शेकापचे युवा नेते प्रमोद पाटील (पिंट्याशेट) यांचे निधन

By Raigad Times    04-May-2021
Total Views |
Pramod Patil Shelap leade
 
अलिबाग । पेण येथील शेकापचे युवा नेते, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद पाटील (पिंट्याशेट) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (4 मे) निधन झाले. ते 40 वर्षांचे होते.
 
पिंट्या पाटील हे जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समिती सभापती अ‍ॅड. निलिमा धैर्यशिल पाटील यांचे बंधू होते. त्यांनी रायगड जिल्हा परिषदेत कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून काम केले होते.
 
आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने पनवेल येथील लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे निधन झाले आहे. या युवा नेत्याच्या अशा अकाली जाण्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.