नोकरीची संधी : भारतीय ग्रामीण डाक सेवक पदासाठी 26 मे पर्यंत अर्ज स्वीकारणार

By Raigad Times    21-May-2021
Total Views |
 Gramin Dak Sevak Recruitm
 
अफवांना, भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन
 
नवी मुंबई : भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालय, मुंबई (Circle Office, Mumbai) यांनी पत्र क्र. No.Estt/4-1/GDS ONLINE ENGAGEMENT/ 3 RD CYCLE/2021 द्वारे ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तसेच सदर जाहिरातीनुसार अधिक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या (BPM) 13 ही पदे भरली जाणार आहेत.
 
पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 26 मे, 2021 रोजी व त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पुढील संकेतस्थळावर OLINE जाऊन भरावेत, ते आवाहन करण्यात आले आहे. (http://appost.in/gdsonline/ )अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 मे, 2021 असून इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश: (By hand) आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. सदर अर्जासाठीची फी प्रधान डाकघर, पनवेल -410 206 येथे जमा करु शकता.
 
भारतीय डाक विभाग पैसे भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फोन व संदेश पाठवत/करत नाही. निवड झालेल्या उमेदवारांना सिस्टिम जनरेटेड संदेश त्यांची निवड झाल्यावर प्राप्त होऊ शकेल. आवश्यक पत्र व्यवहार (गरज असल्यास ) अधिकृत भरती कार्यालयामार्फत केला जाईल, याची नोंद घ्यावी.
 
म्हणून उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की, आपला नोंदणीकृत क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करु नये व अशा फेक /फसव्या अफवांपासून सावध रहावे. तसेच भारतीय डाक विभाग कोणत्याही हेतूसाठी आपणास फोन करत नाही. म्हणून उमेदवारांनी याबाबतीत जागरुक राहावे व कोणत्याही अफवांना, भूलथापाना बळी पडू नये.
 
अधिक माहितीसाठी http://appost.in/gdsonline या संकेतस्थळास भेट द्यावी. याबाबतचे नियम व अटी वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे वरिष्ठ अधिक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग पनवेल विभाग यांनी एका परिपत्रकाव्दारे कळविले आहे.