सुतारवाडीत आ.भरत गोगावले यांच्या गाडीवर हल्ला

02 May 2021 23:07:17
car broken_1  H 
 
पोस्कोच्या भंगारवरून सेना-राष्ट्रवादीत जुंपल्याची चर्चा
 
रोहा । रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे शिवसेनेचे महाडचे आ. भरत गोगावले यांची गाडी फोडण्यात आली. हा हल्ला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे सुतारवाडी परिसरातील वातावरण तंग झाले असून याठिकाणी दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.
 
भिरा फाटा ते सुतारवाडी या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोस्को कंपनीतील भंगारवरून हा वाद असल्याचे बोलले जात आहे. याआधी देखील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. आज पोस्को कंपनीच्या कॉईल घेऊन जाणार्‍या गाडीवरील चालकाला मारहाण करण्यात आली. मात्र हा चालक स्थानिक असल्याने गावात बातमी पसरताच, 150 ते 200 ग्रामस्थ सुतारवाडी येथील ग्रीन ब्लॉसम या रिसॉर्टवर धडकले. आणि त्यांनी गाड्या फोडण्यास सुरुवात केली. यामध्ये पोस्को कंपनीच्या गाड्या, खाजगी वाहने अशा 20 ते 25 वाहनांचे नुकसान झाल्याचे समजते.
 
दरम्यान, या घटनेनंतर या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0