खालापूर : नारंगी येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा

12 May 2021 20:55:42
vaccination center in kha
 
वावोशी । खालापूर तालुक्यातील वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उसरोली उपकेंद्रांंतर्गत नारंगी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण शाळेमध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
 
या लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती नरेश पाटील आणि खालापूर पंचायत समितीचे खरिवली विभागाचे सदस्य उत्तम परबळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
 
याप्रसंगी गटविकास अधिकारी संजय भोये, नारंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच देशमुख, उपसरपंच उद्धव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खालापूर तालुका महिला अध्यक्षा श्वेता मनवे, बंधू मलबारी, राकेश देशमुख, पोलीस पाटील वासुदेव देशमुख, तेजल पाटील, ग्रामसेवक गणेश मोरे, आरोग्य समुदाय अधिकारी अश्विनी साने, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी उपस्थित होते.

vaccination center in kha 
 
या लसीकरण केंद्रामध्ये नारंगी, चिलठण, खरीवली आणि खानाव या चार ग्रामपंचायतींच्या अंतर्गत गावांचा समावेश आहे. त्यामुळे आता या गावांमधील नागरिकांना वावोशी किंवा अन्य केंद्रावर लसीकरणासाठी रात्री किंवा भल्या पहाटे जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही. त्यांचा हा त्रास वाचला असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी नागरिकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, याकरिता निवारा शेड, खुर्च्या, वीज, पंखे, विश्रामगृह आणि पाण्याची व्यवस्था नारंगी ग्रामपंचायतीकडून चांगल्या पद्धतीने केली आहे.
---------------------------------------------
उसरोली उपकेंद्रांतर्गत कोविड लसीकरण केंद्र सुरु झाल्याने खानाव, चिलठण, खरीवली आणि नारंगी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत गावातील वाड्या वस्त्यामधील लोकांना वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री किंवा पहाटे जाऊन रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचला असून येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- उद्धव देशमुख,
सरपंच, ग्रामपंचायत नारंगी, ता.खालापूर
 

advt mahendra dalvi_1&nbs 
Powered By Sangraha 9.0