उभ्या ट्रेलरला रिक्षाची धडक; रिक्षाचालक गंभीर जखमी

By Raigad Times    09-Apr-2021
Total Views |
Accident_road accident_1&
 
भेंडखळ-नवघर रस्त्यावरील घटना
 
जेएनपीटी । भेंडखळ - नवघर रस्त्यावर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रेलरला भरधाव वेगाने येणार्‍या रिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.
 
आज (9 एप्रिल) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, यामध्ये रिक्षाच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातग्रस्त रिक्षा ही खोपटा पुलाकडून भरधाव वेगाने येत होती. भेंडखळ - नवघर गावाजवळील रस्त्यावर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रेलरला या रिक्षाने धडक दिली. या अपघातात रिक्षाचा समोरील भागाचे मोठे नुकसान होऊन, रिक्षा चालक गंभीर जखमी झाला.
 
यावेळी सदर रस्त्यावरुन मार्गक्रमण करणार्‍या प्रवासी, नागरिकांनी रिक्षाचालकाला बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पुढील कार्यवाही सुरु केली.