रोह्यात 9 दुकान मालकांवर पालिकेची कारवाई

By Raigad Times    09-Apr-2021
Total Views |
action against shops _1&n 
 
कोरोना नियमांचे उलंघन केल्याने कारवाईचा बडगा
 
रोहा (मिलिंद अष्टीवकर) रोहा नगर परिषदेने व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई सुरु केली असून कोरोना नियमांचे उलंघन करणार्‍या 9 व्यापार्‍यांवर ही कारवाई करण्यात आली.
 
याअगोदर 24 व्यापार्‍यांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु काही व्यापारी नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा व्यापार्‍यांवर पालिकेने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई केली आहे.
 
रोहा नगरपालिकेच्या हद्दीत अत्यावश्यक सेवेखाली काही दुकाने सुरु आहेत. दुकान चालक, मास्क न वापरता ग्राहकांना सेवा देत आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यापार्‍यांवर रोहा पोलीस व नगर पालिका प्रशासन संयुक्तपणे दंडात्मक कारवाई करीत आहे.
 
मिनी लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचे नियम धाब्यावर बसवणार्‍या व्यापार्‍यांवर पोलीस व नगरपालिकेने आज पुन्हा संयुक्त दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये 9 व्यापार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.