रायगडात आज कोरोनाचे 1 हजार 47 नवे रुग्ण; 5 मृत्यू

09 Apr 2021 23:28:16
Raigad Corona Updates _1&
 
दिवसभरात 662 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यात आज (9 एप्रिल) कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार पार गेली आहे. आज 1 हजार 47 रुग्ण कोविड पॉझिटीव्ह आले असून, 5 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 662 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
 
आजच्या अहवालानुसार, पनवेल महापालिका क्षेत्रात 529 रुग्ण नोंदवले गेले आहेत. तर पनवेल ग्रामीणमध्ये 78 पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल अलिबागमध्ये 102, कर्जतमध्ये 81, पेणमध्ये 60, खालापूरात 59 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत.
 
आजअखेर रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 79 हजार 820 झाली आहे. यापैकी 71 हजार 144 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 1 हजार 813 वर गेला आहे. सद्यस्थितीत 6 हजार 863 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (9 एप्रिल) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

Raigad Corona Report_1&nb 
Powered By Sangraha 9.0