म्हसळ्यात आज कोरोनाचे 4 नवे नोंद

By Raigad Times    07-Apr-2021
Total Views |
pen covid 19_1  
तालुक्यात सक्रीय रुग्णांची संख्या 24 वर
 
म्हसळा (सुशील यादव) म्हसळा तालुक्यात खंडीत झालेली कोरोनाची साखळी आता हळूहळू पुन्हा डोकं वर काढू लागली आहे. आज (7 एप्रिल) नव्याने 4 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली असून, तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 24 झाली आहे.
 
म्हसळा गवळआळी परिसरातील 30 वर्षीय तरुण, मेंदडी येथील 16 वर्षीय युवक, खामगाव येथील 65 वर्षीय वृद्ध महिला आणि कांदळवाडा येथील 60 वर्षीय वृद्ध पुरुष यांची कोरोा चाचणी आज पॉझिटीव्ह आल्याची माहिती म्हसळ्याचे तहसीलदार शरद गोसावी यांनी दिली आहे.
 
आजअखेर तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 357 झाली असून, यापैकी 319 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 14 रुग्ण दगावले आहेत. सद्यस्थितीत 24 पॉझिटीव्ह रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती तहसीलदार गोसावी यांनी दिली.