सुधागडः सात वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

By Raigad Times    06-Apr-2021
Total Views |
 girl_1  H x W:
 
48 वर्षीय इसमाला पाली पोलीसांनी केले अटक
 
सुधागड-पाली । एका 7 वर्षीय दिव्यांग चिमुकलीवर 48 वर्षीय इसमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना सुधागड तालुक्यातील शिलोशी गावात घडली आहे. या प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
 
पाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील 7 वर्षीय चिमुकलीच्या घरातील मंडळी कामासाठी बाहेर गेली होती. ती घराच्या ओटीवर खेळत होती. हे पाहून 48 वर्षीय इसमाने या मुलीला आपल्या घरात नेले व दरवाजे लावून तिला मका खाण्यास दिला. त्यानंतर या मुलीचे कपडे काढून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीला चहा पाजून घडलेला प्रकार कोणास सांगू नकोस अशी शपथ देऊन धमकावले.
 
मात्र पिढीत मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या घरातील मंडळीला सांगितला. यानंतर सदर मुलीच्या आजीने सगळी हकीकत पोलिसांना सांगत या व्यक्ती विरोधात विनयभंग व पोक्सो अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.