रायगडात आज 845 नवे कोरोना रुग्ण; 2 मृत्यू

By Raigad Times    06-Apr-2021
Total Views |
raigad covid 19 _1 &
 
413 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यात आज (6 एप्रिल) कोरोना रुग्णांची संख्या 800 पार गेली आहे. दिवसभरात 845 रुग्ण पॉझिटीव्ह आले असून, 2 मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर 413 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
 
आजच्या अहवालानुसार, पनवेल महापालिका क्षेत्रात 471 रुग्ण नोंदवले गेले आहेत. तर पनवेल ग्रामीणमध्ये 111 पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल अलिबागमध्ये 57, पेणमध्ये 48, माणगावमध्ये 40 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत.
 
आजअखेर रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 76 हजार 993 झाली आहे. यापैकी 69 हजार 500 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 1 हजार 793 वर गेला आहे. सद्यस्थितीत 5 हजार 700 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (6 एप्रिल) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

raigad covid 19 _1 &