सुशील यादव / म्हसळा : म्हसळा तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आज(६ एप्रिल) कोरोनाच्या ७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये ३ रुग्ण हे म्हसळा नगरपंचायत हद्दीतील असुन , २ रुग्ण खामगाव येथील आहेत, तर घोणसे व काळसुरी गावात प्रत्येकी १ रुग्ण कोरोना पाॅझीटिव्ह आढळलला आहे.
म्हसळा तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ३५३ इतकी झाली आहे. अशी माहिती म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांनी दिली.
म्हसळा तालुक्यातील ३१९ जण कोरोना मुक्त झाले आहेत तर उपचार सरू असलेल्या कोरोना बधितांची संख्या २० आहे. तालुक्यात कोरोनामुळे १४ जण दगावले आहे.