कोलाड-पुई गावाजवळ अपघात; कोळशाने भरलेला ट्रक पलटी

By Raigad Times    05-Apr-2021
Total Views |
kolad acident_1 &nbs
 
रोहा /धाटाव । गेली दहा वर्षे सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनेक ठिकाणी कामे अर्धवट करून सोडून देण्यात आलेली आहेत. कोलाडनजीक पुई गावाजवळ कोळशाने भरलेला ट्रक रस्त्यावर खोदून ठेवलेल्या मोरीच्या खड्ड्यात जाऊन अपघात झाला. या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.
 
मुंबई-गोवा महामामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली दहा वर्षापासुन सुरु असून सर्व कामे अर्धवट स्थितीत आहेत. महामार्गाच्या कामात विविध ठिकाणी ब्रिज, खिंडीतील खोदकामे, मोर्‍यां, उड्डाण पुल, सर्विस रोड, गटारे, तसेच रस्त्याचे कामे सुरु आहेत. परंतु बहुतांश कामे अर्धवट असून कोणतेही काम पूर्ण होत नाही. यामार्गावर पुई गावानजिक मार्गाच्या कामात एक वर्षापासून मोरीच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या अवस्थेत होते.
 
पुई गावा नजिक मोरीचे खोदकाम एक वर्षा पासून करुन ठेवलेले असून आज पर्यंत या मोरीचे काम तसेच रखडले आहे. सदर ठिकाणी खोदलेल्या खड्ड्यात ट्रकचा टायर स्लिप होऊन पलटी झाल्याची घटना घडली परंतु चालकाच्या सावधानीमुळे कोणतेही जिवीत हानी झाली नाही. दोन महिन्या पूर्वीही फोरव्हीलर गाडी या मोरीच्या खाली गेली होती सुदैवाने त्यावेळी गाडीतील प्रवाश्याचे जीव बचावले होते.
 
खोदून ठेवलेल्या मोरीच्या बाजूला उपाय योजना म्हणून संबधित खात्याकडून केवळ काही काठ्या उभ्या करुन त्या दोरीने बांधून ठेवलेल्या आहेत. अनेक ठिकाणी अशीच अर्धवट कामे राहिलेली असून नॅशनल हायवे प्रशासन मात्र ही कामे तातडीने पूर्ण करून घेण्यास उदासीन दिसत आहेत. तर प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
------------------------------------------------------------------------
महामार्गावर अनेक ठिकाणी कामे अर्धवट असवस्थेत असल्याने याभागतील लोकांना तसेच प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. प्रवाश्यांचे जीव गेल्यावर ही अर्धवट कामे पूर्ण करणार का? पुई येथिल मोरीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.
- संजय मांडलूस्कर, माजी सरपंच पुई