माणगांव । श्रीगुरुदेव जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान दक्षिण पीठ नाणीज धामच्यावतीने घेण्यात येणारा साप्ताहिक सामुहिक सत्संग सोहळा प्रत्येक रविवारी रायगड जिल्ह्यात 194 ठिकाणी होत असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सत्संग सोहळा 11 ऑनलाईन होणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व सत्संग सेवा केंद्र संस्थानाच्यावतीने बंद केलेले आहेत. या महामारीत भक्तांनी आपला आत्मविश्वास गमावू नये, ते अध्यात्मिक मार्गात येऊन त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा, मनाने खचून जाऊ नये, म्हणून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्यावतीने ओ.एम.एस. अॅपच्या माध्यमातून साप्ताहिक सत्संग ऑनलाईन पद्धतीने सुरु राहणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही 11 एप्रिलपासून ऑनलाईन सत्संग सोहळ्याला सुरुवात करण्यात आली आहे. यापुढेही प्रत्येक रविवारी सकाळी 9 वाजता ऑनलाईन सत्संगला सुरुवात होईल. याचा लाभ जास्तीत जास्त भक्तगण, साधक, शिष्य, चाहते यांनी घ्यावा, असे आवाहन ज.न.म. भक्तसेवा मंडळ रायगड समितीच्यावतीने करण्यात आले आहे.