कर्जत : नेरळमधील हनुमान मंदिरात चोरी

17 Apr 2021 17:06:43
theft in temple_Crimein r 
 
दानपेटीतील रक्कम चोरीला
 
कर्जत । कर्जत तालुक्यातील नेरळ येथील हनुमान मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरांनी मारुती मंदिरात वर्षाकाठी दानपेटीत जमा झालेली रोकड लंपास केली आहे. दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भक्तांकडून ही घटना समोर आली. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
गुरुवारी (15 एप्रिल) नेरळ मुख्य बाजारपेठेला लागून असणार्‍या मारुती मंदिरातील दानपेट्यांपैकी एक दानपेटी फोडून चोरांनी रोख रक्कम लंपास केली आहे. मंदिरातील एका दानपेटीत 30 हजारहुन अधिक रोख रक्कम वर्षाकाठी जमा होत असल्याची प्राथमिक माहितीदेखील येथील पुजारी गुरव यांनी पोलिसांना दिली.चोरांनी दानपेटीला नुकसान न करता हुशारीने दानपेटीतील रोकड लंपास केली आहे. तर मंदिराला असलेला मुख्य दरवाजा हादेखील कुलूप न फोडताच उघडून चोरांनी मंदिरात प्रवेश मिळवल्याने तर्कवितर्कला उधाण आले आहे.
 
याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0