उरण : शिवसेनेच्या महारक्तदान शिबिरात 159 जणांनी केले रक्तदान

By Raigad Times    17-Apr-2021
Total Views |
Blood Camp_1  H
 
उरण । कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुडवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत उरण तालुक्यातील शिवसेना-युवासेना नवघर, चिरनेर, जासई विभागाच्यावतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 159 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
 
शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी.एन. डाकी यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
 
शिबिराला जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, हिराजी घरत, कामगार नेते महादेव घरत, गणेश म्हात्रे, गणेश घरत, रुपेश पाटील, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, अमित भगत, गणेश घरत, उप तालुका संघटक कृष्णा घरत, विभाग प्रमुख संदेश पाटील, भूषण ठाकूर, विश्वास तांडेल, शिक्षक सेनेचे कौशिक ठाकूर, युवासेनेचे निशांत घरत, सुदीप ठाकूर, वेश्वी सरपंच संदीप कातकरी, वेश्‍वी शाखा प्रमुख रविंद्र पाटील, सोनारी शाखा प्रमुख नारायण तांडेल, द्रोणागिरी शाखा प्रमुख जगजीवन भोईर, आकाश पाटील, सचिन पाटील, सुमित ठाकूर, प्रज्वल पाटील आदींनी उपस्थिती लावली.

Blood Camp_1  H 
 
देशभरात कोरोनाचे संक्रमण होत असताना अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले होते. मागील वर्षभरात माजी आमदार मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण विधानसभा मतदारसंघात 1200 हुन अधिक रक्तपिशव्या संकलित केल्या होत्या. आता या मोहिमेला पुन्हा नव्याने सुरुवात होत आहे.
 
पहिल्या टप्प्यात उरण तालुक्यात दोन रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रविवारी, 17 एप्रिल रोजी चाणजे तसेच उरण शहर विभाग आणि उरण विधानसभा मतदारसंघात 10 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती माजी आमदार आमदार मनोहर भोईर यांनी दिली. सद्गुरु चॅरिटेबल ब्लड बँक कोपरखैरणे यांच्या सहयोगाने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.