उरण : फुंडे गावाजवळ पूल कोसळला

By Raigad Times    14-Apr-2021
Total Views |
Bridge Collapsed_Funde_Ur
 
पुलावरुन जाणारा मोटारसायकलस्वार बालंबाल बचावला
जेएनपीटी (अनंत नारंगीकर) उरण तालुक्यातील फुंडे गावाजवळचा पूल आज (14 एप्रिल) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोसळला. ही दुर्घटना घडली तेव्हा या पुलावरुन जाणारा मोटारसायकलस्वार थोडक्यात बचावला आहे.
 
महाड तालुक्यात सावित्री नदीवरील पूल कोसळून अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र त्यानंतरही पुलांच्या दूरवस्थेकडे शासनाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे फुंडे येथील पूल दुर्घटनमुळे पुढे आले आहे.

Bridge Collapsed_Funde_Ur 
 
सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत असलेला फुंडे गावाजवळील जेएनपीटी बंदराच्या दिशेने रहदारीसाठी उभारण्यात आलेला पूल आज कोसळला. ही घटना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घडना घडली तेव्हा या पुलावरून मार्गक्रमण करणारा मोटारसायकलस्वार नागरिकांच्या सतर्कतेमुळे बचावला आहे.

Bridge Collapsed_Funde_Ur 
 
ही घटना रात्रीच्या अंधारात घडली असती तर अनेक निष्पाप प्रवासी, नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले असते, अशी भीती व्यक्त करताना स्थानिकांनी या निकृष्ट दर्जाच्या पुलाच्या बांधकामाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Bridge Collapsed_Funde_Ur 
 
या घटनेसंदर्भात फुंडे ग्रामपंचायतीचे सरपंच सागर श्रीधर घरत यांना विचारणा केली असता, त्यांनी माहिती देताना सांगितले की,
सध्या या परिसराचा विकास सिडकोच्या माध्यमातून होत आहे. पूल कोसळण्याची दुर्दैवी घटना रात्रीच्या अंधारात घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता. तरी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Bridge Collapsed_Funde_Ur