रायगड : ट्रकला अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

By Raigad Times    10-Apr-2021
Total Views |
Road Accident_ दुर्घटना_1
 
  • एकजण गंभीर जखमी
  • जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील घटना
खोपोली : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटातील तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक डोंगराला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकच्या पुढील भागात अडकून पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Road Accident_ दुर्घटना_1 
 
ही घटना आज (10 एप्रिल) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त मालवाहू ट्रक पुण्याहून मुंबईकडे निघाला होता. नो एंट्री मार्गे जात असताना ट्रक (एमएच-11/एम-5072) बोरघाटातून खिंडीजवळील तीव्र उतारावर आला असता, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक डोंगराच्या कठड्याला धडकून डोंगरावर आदळला.

Road Accident_ दुर्घटना_1
 
अपघाताची माहिती मिळताच, महामार्ग पोलीस केंद्र, अपघातग्रस्त बचाव पथकाचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि ट्रकमध्ये अडलेल्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र दोघांचा मृत्यू झाला होता. तर एकाला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.