लॉकडाऊन : पहा रायगडात काय सुरु? काय बंद राहणार?

By Raigad Times    10-Apr-2021
Total Views |
Raigad Collector_Nidhi Ch
 
  • जिल्हाधिकार्‍यांचे सुधारित मनाई आदेश जारी
  • अत्यावश्यक सेवेत अन्य काही बाबींचा समावेश
अलिबाग । राज्यासह रायगडात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात 5 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 30 एप्रिल रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्यात वाढत्या कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना म्हणून नव्याने लागू केलेल्या निर्बधांच्या अनुषंगाने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
 
रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार कलम 144 (1) (3) नुसार कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक सेवेत आणखी काही बाबींचा समावेश करत ८ एप्रिल रोजी सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या बाबी खालीलप्रमाणे :
 
अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट सेवा :
  • पेट्रोल पंप व पेट्रोलियम पदार्थाशी निगडीत सेवा
  • गॅस पुरवठा
  • सर्व प्रकारची कार्गो सेवा
  • सर्व प्रकारची मालवाहतूक सेवा
  • डाटा सेंटर/क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हाईडर/टेलिकॉम सर्व्हिस/आयटी सर्व्हिसेस सपोर्टींग क्रिटीकल
  • ईन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस
  • शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा देणार्‍या संस्था
  • फळ विक्रेते,
  • चिकन, मटण, अंडीची दुकाने,
  • मासे विक्री,
  • ऑप्टीकल सर्व्हिसेस,
  • चष्म्यांचे क्लिनिक
  • राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यांना पार्सल सेवा देता येईल
  • गॅरेज सेवा
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रामधील अत्यावश्यक सेवा यामध्ये समाविष्ट असलेली दुकाने ही दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 7 या कालावधीत सुरु राहतील.
 
संबंधित दुकान मालक व काम करणारे कामगार यांनी भारत सरकारने दिलेल्या मापदंडानुसार लसीकरण करुन घेणे आवश्यक व हे लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोविड-19 चाचणी नकारात्मक (नेगेटीव्ह) असल्यासंदर्भातील पंधरा दिवासापर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र (आरटी-पीसीआर) स्वत: जवळ बाळगणे आवश्यक राहील. हा नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू राहील.
तसेच या दुकानांमध्ये येणार्‍या व्यक्ती/ग्राहकाद्वारे फेस कव्हर/मुखपट्टी (मास्क) परिधान केलेली असेल. तसेच त्यांच्यामध्ये आवश्यक सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) राखले जाईल, या अधीनतेने ही दुकाने कार्यान्वित राहतील. संबंधित दुकाने, आस्थापनांमध्ये अतिरिक्त ग्राहक आल्यास त्यांना प्रतिक्षाधीन ठेवावे व त्यांच्यामध्ये आवश्यक सामाजिक अंतर राहील, याची दक्षता घ्यावी. त्याकरिता आवश्यकतेनुसार ठराविक अंतरावर विशिष्ट चिन्हे/ निशाण्या (मार्कींग) आरेखित कराव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
----------------------------------------------------
कोणत्या खाजगी संस्था सुरु राहणार....
 
खाजगी संस्था या घटकांमधील सेबी आणि सेबीमध्ये नोंदणीकृत असलेल्या संस्था (उदा.स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन इ.), रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेले संस्था, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टम ऑपरेटर इ., सर्व नॉन बँकीग वित्तिय संस्था, सर्व मायक्रो फायनान्स संस्था, विधीतज्ञ, सी.ए., सी.एस. यांची कार्यालये, कस्टम हाऊस एजंट्स/लस (व्हॅक्सिन), जीवनारक्षक परवानाधारक मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स, लायसन्स्ड मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर लसांच्या जीवनशैलीशी संबंधित औषधे फार्सक्युटिकल उत्पादने, या खाजगी संस्था दररोज सकाळी 7.00 वा. पासून ते रात्री 8.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु राहतील.
 
या संस्थामध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांनी भारत सरकारने दिलेल्या मापदंडानुसार लसीकरण करुन घेणे आवश्यक राहील व हे लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोविड-19 चाचणी नकारात्मक (नेगेटीव्ह) असल्यासंदर्भातील पंधरा दिवासापर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र (आरटी-पीसीआर) स्वत: जवळ बाळगणे आवश्यक राहील. हा नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू राहील. या बाबींचे उल्लंघन करणारी व्यक्ती रु.1 हजार इतक्या रक्कमेच्या दंडनीय कारावाईस पात्र ठरेल.
---------------------------------------------------
वाहतूक
 
ट्रेन, बस, विमानाद्वारे प्रवास करणार्‍या व्यक्तीस रात्री 8 वाजल्यानंतर व शनिवारी व रविवार या कालावधीत संबधित रेल्वेस्थानक, बसस्थानक, विमानतळावर जाणेसाठी व परत घरी येण्यासाठी त्यांच्याकडे वैध तिकीट असल्याचे अधिनतने प्रवासास मान्यता असेल.
 
उद्योग आणि कामगार
 
औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांस, व्यक्तीस खाजगी बसेस व खाजगी वाहनाने दररोज रात्री 8.00 ते सकाळी 7.00 वाजेपर्यंत व शनिवारी व रविवारीसुध्दा या कालावधीत त्यांच्याकडे संबधित औद्योगिक संस्थेने दिलेले ओळखपत्र धारण करण्याच्या अधीनतने प्रवासास मान्यता असेल.
 
विद्यार्थी
 
एखाद्या विद्यार्थ्यास स्वत: प्रत्यक्ष परीक्षेस उपस्थित राहावयाचे असल्यास, अशा विद्यार्थ्यांस रात्री देखील परीक्षा केंद्रावर, घरी जाण्यासाठी प्रवास त्यासंदर्भातील वैध प्रवेशपत्र धारण करण्याच्या अधीनतेने करता येईल.
 
लग्न समारंभ
 
जे लग्न समारंभ शनिवार व रविवारी आयोजित केलेले आहेत, अशा लग्न समारंभांच्या आयोजनासंदर्भात संबधित तहसिलदार यांनी स्थानिक परिस्थती विचारात घेऊन निर्बंधाच्या अधीनतेने म्हणजेच 50 लोकांच्या मर्यादेत मान्यता देण्यात यावी, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेशित केले आहे.
 
घरगुती काम करणार्‍यांसाठी....
याचबरोबर घरोघरी घरगुती काम करणारे नोकर, ड्रायव्हर, स्वयंपाकी यांना रात्री प्रवास करण्यास व शनिवारी व रविवारी काम करण्यास अनुमती देण्यात आली आहे.
 
रक्त संक्रमण सेवा
 
सार्वजनिक आरोग्य विभागाकडील रक्त संक्रमण सेवा ही आत्यावशक सेवा असल्याने कोविड-19 च्या शासनाने तसेच राज्य रक्त संक्रमण परिषद यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन ऐच्छिक रक्तदान शिबीर आयोजित करता येतील.
 
हा आदेश 5 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री 8 वाजल्यापासून ते 30 एप्रिल 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतुदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.
 
--------------------------------------------------------------
5 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशानुसार मान्यताप्राप्त बाबी :
  • रुग्णालये, निदान केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधालये, औषधी कंपन्या आणि इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा.
  • किराणा, भाजीची दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थांची दुकाने
  • सार्वजनिक वाहतूक - ट्रेन, टॅक्सी, आंटी आणि सार्वजनिक बसेस.
  • विविध देशांच्या दूतावासांच्या (Dimplomates) कार्यालयाशी संबंधित सेवा.
  • स्थानिक प्राधिकरणांकडून केली जाणारी मान्सूनपूर्व तयारी कामे.
  • स्थानिक प्राधिकरणांकडून दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवा.
  • मालाची वाहतूक
  • शेतीसंबंधित सेवा
  • ई-कॉमर्स
  • अधिकृत प्रसारमाध्यमे (Accredited Media)
  • स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे मान्यता दिलेल्या आवश्यक सेवा.
---------------------------------------------
संचारबंदी / जमावबंदी : 
 
रायगड पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सकाळी 7.00 वाजल्यापासून ते रात्री 8.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत एकत्र येण्यास मनाई राहील. तथापि, दररोज रात्री 8.00 वाजल्यापासून ते सकाळी 7.00 वाजेपर्यंत आणि दर शुक्रवारी रात्री 8.00 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी 7.00 वाजेपर्यत कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी पर्याप्त कारणाशिवाय किंवा खालील नमूद मान्यताप्राप्त बाबींशिवाय बाहेर फिरता येणार नाही.
 
या निर्बंधातून वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. या सेवा कार्यान्वित राहण्यास तसेच या सेवांतर्गत केल्या जाणाऱ्या वाहतुकीस कोणतेही निर्बंध लागू राहणार नाहीत. अत्यावश्यक सेवेमध्ये खालील बाबींसह भारत सरकारने मान्यता दिलेले उपक्रम जेएनपीटी, कस्टम, रेल्वे उदा. इ. अंर्तभूत असतील.
 ---------------------------------------------
सार्वजनिक खुल्या ठिकाणांबाबत (Outdoor Activities) :
 
सार्वजनिक ठिकाणे उदा.उद्याने, समुद्रकिनारे, सार्वजनिक मैदाने इ.दररोज रात्री 8.00 वाजल्यापासून ते सकाळी 7.00 वाजेपर्यंत आणि दर शुक्रवारी रात्री 8.00 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी 7.00 वाजेपर्यंत या कालावधीत बंद राहतील.
 
सोमवार, सकाळी 7.00 वाजल्यापासून ते शुक्रवार रात्री 8.00 वाजेपर्यंत अभ्यागतांनी/नागरिकांनी कोविड-19 च्या अनुषंगाने पारित नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. स्थानिक प्राधिकरणांनी सार्वजनिक ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि गर्दी होत असल्याचे व अभ्यागताद्वारे/नागरिकांद्वारे नियमांचे पालन केले जात नसल्याचे निर्दशनास आल्यास, त्या ठिकाणी कोविड-19 विषाणूचा संक्रमण / प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे, असे मत झाल्यास ही ठिकाणे तात्काळ बंद करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.
  ---------------------------------------------
सार्वजनिक वाहतूक
  • सार्वजनिक वाहतूक खालील निर्बंधांच्या अधीनतेने पूर्णपणे कार्यान्वित राहील.
  • तीन चाकी वाहने (ऑटो रिक्षा प्रकारातील), अनुज्ञेय प्रवासी संख्या एक वाहक + दोन व्यक्ती, तीन चाकी मान्यताप्राप्त प्रवासी वाहतुकीची वाहने (विक्रम रिक्षा प्रकारातील) एक वाहक +चार व्यक्ती, चार चाकी वाहने (टॅक्सी, ईको सारखी, वाहने या प्रकारातील) एक वाहक + परिवहन विभागाने मान्यता दिल्यानुसार एकूण क्षमतेच्या 50 टक्के व्यक्तींच्या मर्यादेत, चार चाकी वाहने (बस, मिनी बस या प्रकारातील) परिवहन विभागाने मान्यता दिल्यानुसार पूर्ण क्षमतेने, तथापि कोणताही प्रवासी उभ्याने प्रवास करणार नाही.
  • सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणारे सर्व व्यक्ती/ प्रवासी यांनी व्यवस्थितरित्या फेस कव्हर (Face Cover) / मुखपट्टी (Masks) परिधान करणे बंधनकारक असेल. अन्यथा ही व्यक्ती/प्रवासी तसेच या वाहनाचा चालक/वाहक हे देखील रु.500 /- इतक्या रक्कमेच्या दंडनीय कारवाईस पात्र ठरतील. प्रत्येक फेरीनंतर या वाहनांचे योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण (Sanitize) केले जाईल.
  • सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे चालक व इतर कर्मचारी वर्ग जे प्रत्यक्षरित्या प्रवासी/नागरिकांच्या संपर्कात येतात त्यांनी भारत सरकारने दिलेल्या मापदंडानुसार लसीकरण करुन घेणे आवश्यक राहील व हे लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्यासंदर्भातील पंधरा दिवसांपर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र (RT-PCR) स्वत:जवळ बाळगणे आवश्यक राहील. हा नियम दि.10 एप्रिल 2021 पासून लागू राहील.
  • ऑटो/टॅक्सी इ. वाहनांच्या वाहनचालकाने स्वत:ला प्लास्टिक शिट, कव्हर यासारख्या माध्यमाद्वारे अलगीकरण करुन घेतल्यास, त्यांना वरील बाबीमधून सूट मिळू शकेल. एखादा वाहनचालक व इतर संबधित कर्मचारी वर्ग यांनी वरील सूचनांप्रमाणे लसीकरण केले नसल्याचे अथवा कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्यासंदर्भातील (RT-PCR) प्रमाणपत्रासह नसल्याचे आढळून आल्यास, संबंधित व्यक्ती रू.1 हजार इतक्या दंडनीय रक्कमेच्या कारवाईस पात्र राहील.
  • बाहेरगावाहून येणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या बाबतीत सामान्य डब्यामध्ये (General Compartment) कोणतीही व्यक्ती उभ्याने प्रवास करणार नाही तसेच सर्व प्रवाशांनी फेस कव्हर (Face Cover) / मुखपट्टी (Masks) परिधान केले आहेत, याची पडताळणी रेल्वे प्राधिकरणाकडून करण्यात यावी. सर्व रेल्वे गाडयांमध्ये फेस कव्हर (Face Cover) / मुखपट्टी (Masks) परिधान न करता प्रवास करणारी व्यक्ती/ प्रवासी रु.500/- इतक्या रक्कमेच्या दंडनीय कारवाईस पात्र ठरतील.
  ---------------------------------------------
खाजगी वाहतूक :
  • खासगी बसगाड्यांसह खासगी वाहनांची वाहतूक सोमवारी सकाळी 7.00 वाजल्यापासून ते शुक्रवार रात्री 8.00 वाजेपर्यंत या कालावधीत नेहमीप्रमाणे सुरु राहील. तथापि दररोज रात्री 8.00 वाजल्यापासून ते सकाळी 7.00 वाजेपर्यंत व दर शुक्रवारी रात्री 8.00 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी 7.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत आपत्कालीन व अत्यावश्यक बाबींसाठीच खाजगी वाहतूक सुरु ठेवता येईल.
  • खाजगी बस शासनाने घातलेल्या निर्बंधांच्या अधीनतेने सुरु राहतील. परिवहन विभागाने मान्यता दिल्यानुसार पूर्ण बैठक क्षमतेने तथापि कोणताही प्रवासी उभ्याने प्रवास करणार नाही. या वाहतूक व्यवस्थेचे चालक व इतर कर्मचारी वर्ग यांनी भारत सरकारने दिलेल्या मापदंडानुसार लसीकरण करुन घेणे आवश्यक राहील व हे लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्यासंदर्भातील पंधरा दिवासापर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र (RT-PCR) स्वत: जवळ बाळगणे आवश्यक राहील. हा नियम दि. 10 एप्रिल 2021 पासून लागू राहील.
---------------------------------------------
कार्यालये :
  • सहकारी, सार्वजानिक आणि खाजगी बँका, विद्युत पुरवठा संबंधित कंपन्या, दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या आस्थापना, विमा/मेडिक्लेम संबंधित कंपन्या, औषध निर्माण कंपन्यांचे उत्पादन आणि वितरणाच्या व्यवस्थापनाशी संबधित कार्यालये तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मान्यता दिलेली कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.
  • कोविड-19 विषाणूमुळे निर्माण झालेल्या साथरोगास प्रतिबंध करण्यासाठी कार्यन्वित ठेवणे आवश्यक असलेली कार्यालये 100 टक्के क्षमतने कार्यान्वित ठेवण्याबाबत संबधित विभागप्रमुख /कार्यालय प्रमुख निर्णय घेतील. अशा शासकीय कार्यालयाव्यतिरिक्त अन्य शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतने कार्यान्वित राहतील.
  • वीज, पाणी, बँकिंग व इतर वित्तीय सेवेशी संबधित शासकीय कार्यालये व शासकीय कंपन्या पूर्ण क्षमतेसह कार्यरत राहतील.
  • शासकीय कार्यालये तसेच शासकीय कंपन्यांच्या बाबतीत त्या कार्यालयाच्या/कंपन्यांच्या परिसरात उपस्थित असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्याशिवाय अन्य अधिकारी/कर्मचारी/व्यक्तींबरोबर घेण्यात येणाऱ्या बैठका या ऑनलाईन पध्दतीनेच आयोजित करण्यात येतील.
  • शासकीय कार्यालयात तसेच शासकीय कंपन्यांमध्ये अभ्यागतांना प्रवेश देण्यासाठी लवकरात लवकर ई-व्हिजिटर सिस्टम (E-Visitor System) सुरू करावी. शासकीय कार्यालयांमध्ये अपवादात्मक परिस्थितीत विभागप्रमुख/कार्यालय प्रमुख संबधित अभ्यागताकडे कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वीच्या 48 तासांमधील कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्यासंदर्भातील प्रमाणपत्र (RT-PCR) असल्यास त्यास पास देण्याची कार्यवाही करतील.
---------------------------------------------
मनोरंजन व करमणूक
  • सिनेमा हॉल, नाट्यगृह व सभागृह, अॅम्युझमेंट पार्क/आर्केड्स/व्हिडिओ गेम पार्लर, वॉटर पार्कस् (Water parks), क्लब (Club), जलतरण तलाव (Swimming Pool ), जिम (Gym) व क्रीडा संकुल (Sport Complexes ) बंद राहतील.
  • या आस्थापनांशी संबंधित सर्व व्यक्ती/कर्मचारी यांनी भारत सरकारने दिलेल्या मापदंडानुसार लसीकरण करुन घ्यावे, जेणेकरुन शासनास या दुकाने/आस्थापनांद्वारे कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव होणार नाही, याची खात्री होऊन ही दुकाने/आस्थापना लवकरात लवकर सुरु करण्याबाबत निर्णय घेता येईल.
  • चित्रपट /मालिका/ जाहिरातींचे चित्रीकरण खालील निर्बंधांच्या अधीनतेने करता येईल.
  • सामान्यत: मोठ्या संख्येने कलाकारांच्या उपस्थितीत चित्रीकरण टाळावे.
  • या चित्रीकरणाशी संबधित व्यक्ती, कलाकार तसेच कर्मचारी यांनी कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्यासंदर्भातील पंधरा दिवासापर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र (RT -PCR) स्वत: जवळ बाळगणे आवश्यक राहील. हा नियम दि.10 एप्रिल 2021 पासून लागू राहील.
  • चित्रीकरणाशी संबधित व्यक्ती, कलाकार तसेच कर्मचारी यांच्यासाठी अलगीकरण कक्ष (QuarantineBubble) तयार केला गेल्यास त्यामध्ये या कार्यालयाद्वारे मान्यता दिल्यानुसार पर्याप्त संख्येत कोविड-19 चाचणी अहवाल (RT-PCR) नकारात्मक (Negetive) असलेल्यांनाच प्रवेश देता येईल.
 ---------------------------------------------
रेस्टॉरंटस्, बार, हॉटेल्स, मद्य विक्री दुकाने :
  • एखाद्या हॉटेलचाच भाग असलेले उपहारगृह (Restaurant) आणि बार (Bar) या व्यतिरिक्त सर्व उपहारगृहे (Restaurants) आणि बार (Bar) बंद राहतील. उपहारगृहे (Restaurants) आणि बार (Bar) मधून सोमवारी सकाळी 7.00 वाजल्यापासून ते शुक्रवार रात्री 8.00 वाजेपर्यंत या कालावधीत ऑर्डरप्रमाणे पदार्थ घेऊन जाणे (Take away orders), पार्सल (Parcels) देणे, घरपोच सेवा (Home Delivery) देणे इ. परवानगी असेल. तथापि, शनिवार व रविवार या दिवशी सकाळी 7.00 वा. पासून ते रात्री 8.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत केवळ घरपोच सेवा (Home Delivery) देता येईल. या दिवशी ऑर्डर देण्यासाठी किंवा पार्सल घेण्यासाठी कोणत्याही उपहारगृह व बारला भेट देता येणार नाही.
  • एखाद्या हॉटेलचा भाग असलेले उपहारगृह (Restaurant) आणि बार (Bar) हे केवळ तेथील पाहुण्यांसाठी सुरु राहतील. कोणत्याही बाहेरच्या पाहुण्यास अथवा अभ्यागतास उपहारगृह (Restaurant) आणि बार (Bar) मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. या अभ्यागतांना अन्य उपहारगृह (Restaurant) आणि बार (Bar) साठी लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करावे लागेल.
  • मद्यविक्रीचे एफएल-1 (विदेशी मद्याचे ठोक विक्रेते) अनुज्ञप्ती सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र शुक्रवारी सायंकाळी 6.00 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7.00 वाजेपर्यंत या अनुज्ञप्ती पूर्णत: बंद राहतील. तसेच एफएल-3 ( परवाना कक्ष) अनुज्ञाप्ती प्रत्येक शनिवारी व रविवारी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत केवळ घरपोच सेवे द्वारे (Home Delivery) मद्याची विक्री करु शकतील. जे परवाना कक्ष लॉजिंग/निवास कक्षाशी संलग्न आहेत, त्यांना त्यांच्या संकुलांतर्गत निवासी असलेल्या व्यक्तींना मद्य विक्री करता येईल.
  • घरपोच सेवा देणाऱ्या (Home Delivery) कर्मचाऱ्यास भारत सरकारने दिलेल्या मापदंडानुसार लसीकरण करुन घेणे आवश्यक राहील व त्याचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्यासंदर्भातील पंधरा दिवासापर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र (RT-PCR) स्वत:जवळ बाळगणे आवश्यक राहील. हा नियम दि. 10 एप्रिल 2021 पासून लागू राहील.
  • एखाद्या कर्मचाऱ्याने वरील सूचनांप्रमाणे लसीकरण केले नसल्याचे अथवा कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्यासंदर्भातील (RT-PCR) अहवालासह नसल्याचे आढळून आल्यास, संबंधित कर्मचारी तसेच आस्थापना प्रत्येकी रू.01 हजार इतक्या दंडनीय रक्कमेच्या कारवाईस पात्र राहील. या बाबींची पुनरावृत्ती संबंधित आस्थापनेमार्फत केली गेल्यास संबंधित आस्थापना कोविड-19 विषाणूची साथ असेपर्यंत बंद करण्यात येईल.
  ---------------------------------------------
प्रार्थनेची धार्मिक ठिकाणे :
 
सर्व धार्मिक स्थळे बंद राहतील. सर्व धार्मिक /प्रार्थनास्थळी काम करणारे व्यक्ती पूर्वीप्रमाणेच त्यांची कामे करु शकतील, फक्त या ठिकाणी बाहेरुन अभ्यागतांना/ भाविकांना परवानगी असणार नाही.
  ---------------------------------------------
सलून/स्पा/ब्युटी पार्लर/बार्बर शॉप :
सर्व सलून/ स्पा/ब्यूटी पार्लर /बार्बर शॉप बंद राहतील. या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी भारत सरकारने दिलेल्या मापदंडानुसार लवकरात लवकर लसीकरण करुन घेणे आवश्यक राहील, जेणेकरुन ही ठिकाणे लवकरात लवकर उघडण्याबाबत निर्णय घेता येईल.
  ---------------------------------------------
वर्तमानपत्रे :
वर्तमानपत्रे छापली आणि प्रसारित केली जाऊ शकतील. आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या कालावधीत घरपोच सेवा (Home Delivery) सुरु राहील.
--------------------------------------------- 
 
शाळा व महाविद्यालये
  • शाळा व महाविद्यालये बंद राहतील. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेकरीता हे निर्बंध शिथिल करण्यात येतील. या परिक्षेपूर्वी संबधित कर्मचारी वर्गाने एकतर लस दिली पाहिजे किंवा 48 तासांकरीता वैध कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्यासंदर्भातील प्रमाणपत्र (RT-PCR) अशा कर्मचाऱ्यांकडे असले पाहिजे.
  • राज्याबाहेरील कोणतेही मंडळ, विद्यापीठ किंवा प्राधिकरणांकडून आयोजित केलेल्या परिक्षांच्या संचालनामुळे राज्यातील या परिक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार असले, तर या परिक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास कळवून, राज्य शासनाच्या संबंधित विभागाच्या मान्यतने संबंधित परिक्षा आयोजित करता येईल.
  • सर्व प्रकारचे खासगी प्रशिक्षण वर्ग बंद राहतील.
  • सर्व शाळा व महाविद्यालयातील आस्थापनांनी भारत सरकारने दिलेल्या मापदंडानुसार लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, जेणेकरुन संबंधित आस्थापना लवकरात लवकर उघडण्याबाबत निर्णय घेता येईल.
 ---------------------------------------------
धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम
  • कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रम आयोजीत करता येणार नाहीत. लग्न समारंभासाठी 50 पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती अनुज्ञेय राहणार नाही. या ठिकाणी फेस कव्हर (Face Cover)/मुखपट्टी (Masks) परिधान केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. या ठिकाणी ताप (Fever) असलेला व्यक्ती प्रवेश करणार नाही, याची खात्री करण्याकरिता Thermal Scanning व्यवस्था करणे आवश्यक राहील. या ठिकाणी Sanitizer, Handwash सोयीस्कर जागी ठेवणे आवश्यक राहील. संबधित आस्थापनांनी प्रवेश करणाऱ्या व्यक्तीद्वारे मास्क परिधान करण्यात आलेला आहे, तसेच त्यांच्याद्वारे आवश्यक सामाजिक अंतर राखले जात आहे, याची पडताळणी करण्याकरिता आवश्यक प्रमाणात कर्मचारीवृंद नियुक्त करावा.
  • लग्न मंडपात/लग्न आयोजित केलेल्या सभागृहात कार्यरत कर्मचारी वर्गाचे एकतर लसीकरण करुन घेणे आवश्यक राहील अथवा कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्या-संदर्भातील 48 तासांपूर्वीचा अहवाल (RT-PCR) स्वत: जवळ बाळगणे आवश्यक राहील.
  • एखाद्या कर्मचाऱ्याने वरील सूचनांप्रमाणे लसीकरण केले नसल्याचे अथवा कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्यासंदर्भातील (RT-PCR) अहवालासह नसल्याचे आढळून आल्यास, संबंधित कर्मचारी तसेच आस्थापना प्रत्येकी रू.1 हजार इतक्या दंडनीय रक्कमेच्या कारवाईस पात्र राहील.
  • या बाबींची पुर्नरावृत्ती संबंधित आस्थापनेमार्फत केली गेल्यास या आस्थापना ही कोविड-19 विषाणूची साथ असेपर्यंत बंद करण्यात येतील.
  • अनावश्यक गर्दी न होऊ देता, (Non Covid व्यक्तींसाठी) आवश्यक शारिरीक अंतर (Physical distance) ठेवून कमाल 20 व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडता येतील. या ठिकाणी नियुक्त कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घेणे आवश्यक राहील व लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्यासंदर्भातील प्रमाणपत्र (RT-PCR) स्वत: जवळ बाळगणे आवश्यक राहील. या बाबींची अंमलबाजणी करण्याची जाबाबदारी स्थानिक प्राधिकरण/ प्रशासन यांची राहील.
 ---------------------------------------------
रस्त्यालगतचे खाद्यपदार्थ विक्रेते : 
  • रस्त्यालगतच्या खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांवर खाण्यासाठी कोणत्याही प्रकारे अन्नसेवा दिली जाणार नाही. दररोज सकाळी 7.00 वा. पासून ते शुक्रवार रात्री 8.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत पार्सल (Parcels), घरपोच सेवा (Home Delivery) देता येईल. या ठिकाणी पार्सल (Parcels) घेण्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या ग्राहकांनी काऊंटर पासून दूर आवश्यक सामाजिक अंतर (Social Distance) ठेवून प्रतिक्षा करणे आवश्यक राहील.
  • या निर्बंधांचे उल्लंघन केले गेल्यास संबधित खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे स्टॉल कोविड-19 विषाणूची साथ असेपर्यंत बंद करण्यात येतील.
  • अशा प्रकारच्या आस्थापनांशी संबंधित असलेल्या सर्वांनी भारत सरकारने दिलेल्या मापदंडानुसार लसीकरण करुन घेणे आवश्यक राहील व लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्यासंदर्भातील पंधरा दिवसापर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र (RT-PCR) स्वतःजवळ बाळगणे आवश्यक राहील. हा नियम दि. 10 एप्रिल 2021 पासून लागू राहील.
  • जर संबधित विक्रेत्यांमार्फत कोविड-19 विषयक प्रतिबंधांचे योग्य प्रकारे पालन करण्यात येत आहे, असे स्थानिक प्राधिकरणाचे मत झाल्यास ते दि.10 एप्रिल 2021 पर्यंतच्या मुदतीत वाढ करुन देऊ शकतील. स्थानिक प्राधिकरणाने सीसीटीव्ही तसेच आवश्यक कर्मचाऱ्यांच्या तपासणीसाठी नियुक्ती करावी व त्या माध्यमातून या ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवावे.
---------------------------------------------
बांधकामाबाबत :
  • ज्या ठिकाणी बांधकाम मजूर प्रत्यक्ष बांधकाम ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्याच ठिकाणी बांधकाम चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येईल.
  • बांधकाम साईटवर बांधकाम साहित्यासाठी होणारी ये-जा या व्यतिरिक्त अन्य प्रकारची ये-जा टाळण्यात यावी.
  • बांधकाम करणाऱ्या संबंधित व्यक्तींनी भारत सरकारने दिलेल्या मापदंडानुसार लसीकरण करुन घेणे आवश्यक राहील व हे लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्यासंदर्भातील पंधरा दिवासापर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र (RT-PCR) स्वत:जवळ बाळगणे आवश्यक राहील. हा नियम दि.10 एप्रिल 2021 पासून लागू राहील.
  • या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास बांधकाम विकासकास रु.10 हजार दंड करण्यात येईल. वारंवार निर्देशांचे उल्लंघन केल्यास या सुरु असलेल्या बांधकामास कोविड-19 विषाणूची साथ असेपर्यंत स्थगिती देण्यात येईल.
 ---------------------------------------------
सहकारी गृहनिर्माण संस्था :
  • कोणतीही सहकारी गृहनिर्माण संस्था ज्यामध्ये 5 पेक्षा अधिक अॅक्टिव करोना रुग्ण आहेत, अशा सहकारी गृहनिर्माण संस्थाना सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zones) म्हणून घोषित करण्यात येईल. अशा गृहनिर्माण संस्थांनी प्रवेशद्वारावर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zones) असल्याचा फलक प्रदर्शित करणे व संस्थेमध्ये प्रवेश करु इच्छिणाऱ्या व्यक्तींना प्रवेश नाकारणे आवश्यक राहील.
  • सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zones) म्हणून घोषित करण्यात येणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी प्रतिबंधित क्षेत्राचे सर्व निर्बंध, जसे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (Micro Containment Zones) असल्याचा फलक प्रदर्शित करणे, येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवणे इ. चे पालन करणे आवश्यक राहील.
  • या निर्देशांचे कोणत्याही गृहनिर्माण संस्थेकडून उल्लंघन झाल्यास पहिल्या वेळी रु.10 हजार इतका दंड व पुढील उल्लंघनासाठी स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केलेला अधिकचा दंड संस्थेला द्यावा लागेल. त्यानुसार जमा झालेल्या दंडाच्या रक्कमेचा विनियोग गृहनिर्माण संस्थेमार्फत मानक कार्यप्रणालीचा (SOP) अवलंब करण्यासाठी येत आहे अगर कसे? याची तपासणी, पर्यवेक्षण करण्याकरीता कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर करण्यात यावा.
  ---------------------------------------------
उत्पादन क्षेत्र :
  • उत्पादन प्रक्रिया खालील बंधनासह सुरु राहील. सर्व कारखाने/उत्पादन ठिकाणावर कामगारांनी प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या शरीराचे तापमान मोजण्यात यावे. त्याकरीता Thermal Scanning व्यवस्था करणे आवश्यक राहील.
  • उत्पादन ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्ती (कामगार, व्यवस्थापक) यांनी लवकरात लवकर भारत सरकारने दिलेल्या मापदंडानुसार लसीकरण करुन घेणे आवश्यक असेल.
  • कारखान्यामध्ये कोणीही व्यक्ती करोनाबाधीत आढळल्यास त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे विलगीकरण करण्यात येईल व विलगीकरणात ठेवलेल्या कालावधीचा पगार त्यांना देण्यात येईल.
  • ज्या कारखान्यांमध्ये/कंपनीमध्ये 500 पेक्षा अधिक कामगार काम करतात त्यांनी विलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक राहील. कारखान्यातील कोणताही कामगार करोना बाधित झाल्यास कारखान्याचे निर्जंतुकीकरण पूर्ण होईपर्यंत उत्पादन प्रक्रिया वा कामकाज बंद ठेवण्यात येईल.
  • कारखान्यातील जेवणाच्या व चहाच्या वेळा अशा प्रकारे विभागण्यात येतील जेणेकरुन एकाच वेळी होणार गर्दी नाही.
  • कारखान्यातील शौचालयांचे सातत्याने निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील.
  • कारखान्यामध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी भारत सरकारच्या मापदंडानुसार लवकरात लवकर लसीकरण करुन घेणे आवश्यक राहील. हे लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोविड-19 चाचणी नकारात्मक (Negetive) असल्यासंदर्भातील पंधरा दिवसापर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र (RT-PCR) स्वत:जवळ बाळगणे आवश्यक राहील. हा नियम दि.10 एप्रिल पासून लागू राहील.
  • जर कारखान्यातील कोणतीही व्यक्ती कोविडबाधित झाल्यास त्याला वैद्यकीय रजा देण्यात येईल व कोविड-19 ग्रस्त झाल्याने त्यास कामावरुन कमी करता येणार नाही. संबंधित कामगारास कोविड बाधित असलेल्या काळात पूर्ण पगार व भत्ते देण्यात येतील.
  ---------------------------------------------
 
 ब्रेक दि चेन : आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे...
 
राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी "ब्रेक दि चेन" अंतर्गत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे.
--------------------
१. डी मार्ट, रिलायन्स , बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का ?
 
दि. ४ आणि ५ एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंधांबाबत आदेश काढले आहेत. जी दुकाने, मॉल्स यातील आवश्यक / जीवनावश्यक वस्तू विक्री करीत आहेत ते सुपर मार्केट्स, मॉल्स सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरु राहू शकतील. आवश्यक नसलेल्या वस्तूंचे विभाग बंद राहतील.
 
२. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (विकेंड) लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद ?
 
ब्रेक दि चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद आहेत.
 
३.आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या (विकेंड) लॉकडाऊमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु राहतील काय ?
 
कोविडसंदर्भातील सर्व आरोग्याचे नियम पाळून सुरु राहू शकतील. मात्र नियमांचे पालन होत नाही हे लक्षात आले तर स्थानिक राज्य शासनाची परवानगी घेऊन बाजार बंद करू शकतात. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात काटेकोर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे.
 
४. बांधकाम दुकाने उघडी राहतील का ?
 
बांधकाम साहित्याची दुकाने बंद राहतील.
 
५. वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेजेस, ऑटोमोबाईल दुकाने उघडी राहतील का ?
 
वाहतूक सुरु असल्याने दुरुस्ती करणारी गॅरेजेस सुरु राहू शकतील. मात्र, त्यांनी कोविडविषयक आरोग्याच्या नियमांचे पालन करायचे आहे. याच्याशी संबंधित दुकाने मात्र बंद राहतील. कोविड नियम न पाळणारी गॅरेजेस कोविड संसर्ग असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
 
६. केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना (पीएसयू) आवश्यक सेवा म्हणून संबोधता येतील का ?
नाही. सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पीएसयू हे आवश्यक सेवेत येत नाहीत. आवश्यक सेवेत समाविष्ट असणारेच केंद्र शासनाचे विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील या सेवेतील समजले जातील.
 
७.नागरिक मद्य खरेदी करू शकतात का ?
 
हो. नागरिक हे ४ एप्रिल रोजी उपाहारगृहे आणि बारसाठी काढलेल्या आदेशाप्रमाणे निर्धारित वेळेत बारमधून टेक अवे पद्धतीने किंवा होमडिलिव्हरीने मद्य खरेदी करू शकतात.
 
८. मद्यविक्री दुकान सुरु राहू शकतील का ? होम डिलिव्हरी होऊ शकेल का ?
 
नाही.
 
९. रस्त्याच्या कडेचा ढाबा सुरु राहू शकतो का ?
 
हो. पण उपहारगृहांप्रमाणेच बसून जेवण करण्यास परवानगी नाही. पार्सल नेऊ शकतात.
 
१०. इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने (एसी, फ्रीज इत्यादी) सुरु राहू शकतील का?
 
नाही.
 
११.दूरसंचारशी सबंधित (डेस्कटॉप, मोबाईल इत्यादी) सुरु राहू शकतील ?
 
नाही.
 
२. आपले सरकार, सेतू केंद्रे सुरु राहू शकतील ?
 
हो. आठवड्याच्या दिवशी (विक डेज) सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात.
 
१३. आठवड्याच्या शेवटी रात्री ८ नंतर किंवा सकाळी ७ च्या आत उपहारगृहे होम डिलिव्हरी करू शकतात का ?
 
आठवड्याच्या नियमित दिवशी ग्राहक उपाहारगृहांतून सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत पार्सल घेऊन जाऊ शकतात. या निर्धारित वेळेनंतर तसेच आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत (विकेंड) ग्राहक पार्सल घेऊ शकणार नाही. मात्र ई कॉमर्समार्फत तसेच उपहारगृहातून होम डिलिव्हरीमार्फत खाद्यपदार्थ मागवता येईल.