अलिबाग तालुक्यात आज 51 नवे कोरोना रुग्ण; तिघांचा मृत्यू

By Raigad Times    01-Apr-2021
Total Views |
alibag _1  H x
 
दिवसभरात 10 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (1 एप्रिल) कोरोनाच्या 51 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत तालुक्यात पहिल्यांदाच 51 रुग्ण एकाच दिवशी पॉझिटीव्ह आले आहेत.
 
दिवसभरात 10 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याची नोंद झाली आहे. आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 613 वर पोहोचली आहे. यापैकी 147 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 5 हजार 215 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 251 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 
आज (1 एप्रिल) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत झालेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :

alibag _1  H x
alibag _1  H x