हायड्राच्या चाकाखाली चिरडून कामगाराचा मृत्यू

By Raigad Times    04-Mar-2021
Total Views |
Road Accident_1 &nbs 
  • महाड औद्योगिक वसाहतीतील घटना
  • गुन्हा दाखल; चालक ताब्यात
महाड । महाड औद्योगिक वसाहतीच्या मुख्य मार्गावर हायड्राचे चाक अंगावरुन गेल्याने 21 वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (4 मार्च) दुपारी घडल्याची माहिती औद्योगिक वसाहत पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी हायड्रा चालकाला ताब्यात घेतले आहे.
 
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये एमआयडीसीमार्फत 40 बाधित गावांना पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीचे काम सुरु आहे. यासाठी हायड्रा (एमएच06बी.यू.8301) ने काही पाईप बिरवाडीकडून नांगलवाडीकडे नेण्याचे काम सुरु होते. हे पाईप जाणार्‍या-येणार्‍यांना लागू नये म्हणून अभिजीत दौड मनी (वय 21, रा.गुलबर्गा, कर्नाटक) हा कामगार पाईप धरुन होता. मात्र कुसगाव फाट्याजवळ अभिजीत मनी रस्त्यावर पडला आणि त्याच्या अंगावरून हायड्राचे चाक गेल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
 
या अपघाताची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी हायड्रा चालक राजू याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार एस.एम. घरत हे करीत आहेत.