रायगडात आज 453 नवे कोरोना रुग्ण; 5 मृत्यू

31 Mar 2021 21:28:27
covid19 _1  H x
 
382 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यात आज (31 मार्च) कोरोनाच्या 453 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 365 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
आजच्या अहवालानुसार, पनवेल शहरात सर्वाधिक 266 रुग्ण नोंदवले गेले आहेत. तर पनवेल ग्रामीणमध्ये 76 पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. महाडमध्ये 22, तर कर्जत आणि अलिबागमध्ये प्रत्येकी 15 रुग्णांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली आहे.
 
आजअखेर रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 72 हजार 471 झाली आहे. यापैकी 66 हजार 864 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 1 हजार 766 वर गेला आहे. सद्यस्थितीत 3 हजार 841 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (31 मार्च) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

Raigad Covid cases _1&nbs 
 
Powered By Sangraha 9.0