वेश्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सोनाली विलास पाटील यांची निवड

By Raigad Times    03-Mar-2021
Total Views |
Sonali Patil_1  
 
जेएनपीटी : उरण तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या वेश्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सोनाली विलास पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोनाली पाटील या वेश्वी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा जासई विभागातील सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.
 
वेश्वी ग्रामपंचायतीच्या नुकताच झालेल्या निवडणुकीत सोनाली विलास पाटील या भरघोस मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच संदिप गणपत कातकरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत वेश्वी ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी सर्वानुमते खेळीमेळीच्या वातावरणात उपसरपंच पदी सोनाली विलास पाटील यांची बिनविरोध निवड केली आहे.
 
यावेळी वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच संदिप कातकरी, ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील,संदिप पाटील, सुनिल तांबोळी, नुतन मुंबईकर, प्रमिला मुंबईकर, ज्योत्स्ना पाटील, निकिता मोहिते, ग्रामसेविका  रेश्मा ज. ठाकूर,माजी सरपंच विलास पाटील, माजी सरपंच विजय पाटील, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्षा  राणी म्हात्रे, के. बी. पाटील सह शेकाप, भाजप, शिवसेना, काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी नवनिर्वाचित उपसरपंच  सोनाली विलास पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.