पनवेल येथे अल्पवयीन मुलीवर 17 वर्षाच्या मुलाचा लैंगिक अत्याचार

By Raigad Times    21-Mar-2021
Total Views |

girl haresmet_1 &nbs
 
पनवेल । अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना पनवेल तालुक्यातील पडघे कोळवाडी येथे घडली. पीडित मुलीचे वय साधारण 13 वर्षे असून शारीरिक अत्याचार करणार्‍या आरोपी मुलाचे वय देखील अवघे 17 वर्षे आहे.
 
आरोपी मुलगा हा त्या मुलीच्या शेजारी राहत होता. त्याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने मुलीला घरात बोलावले आणि दरवाजाची कडी आतून लावून घेतली व अत्याचार केला. ही घटना मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर मुलीच्या आईने पनवेल तालुका पोलिस स्टेशन गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलीसांना सांगितला.
 
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी पोक्सो अंतर्गत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम भादंवि 376 ( 2) या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता कुदळे करीत आहेत.
-------------------------------------------- 
अशा प्रकारे  लैंगिक अत्याचार झाल्यास तिच्या नातेवाईकांनी व इतरांनी कोणतेही भय न बाळगता उघडपणे त्यासंदर्भात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार द्यावी.  - रवींद्र दौंडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पनवेल तालुका