सुधागड तालुक्यात 3 नव्या कोरोना रुग्णांची भर

By Raigad Times    17-Mar-2021
Total Views |
corona image for sudhagad
 
खबरदारी आणि काळजी घेण्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांचे आवाहन
 
पाली/बेणसे । सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. सायंकाळी उशिरा प्राप्त अहवालानुसार मंगळवारी (दि. 16) कोरोनाचे 3 रुग्ण सापडले आहेत. तर 4 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली. नागरिकांनी कोरोना काळात काळजी घ्यावी, नियम पाळावेत अशा सूचना प्रशासन देत असले तरी नागरिक बेफिकीरीने वावरताना दिसत आहेत.
 
सध्या तालुक्यात कोरोनाचे 19 सक्रिय रुग्ण असून यातील 17 रुग्ण गृहविलगीकरणमध्ये तर 2 रुग्ण रूग्णालयात उपचार घेत आहे. सुधागड तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 475 रुग्ण झाले असून 430 रुग्ण बरे झाले आहेत. आणि 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती देखील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली आहे. नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून योग्य खबरदारी व काळजी घ्यावी आणि घाबरून जाऊ नये असे आवाहन देखील डॉ. शशिकांत मढवी यांनी केले आहे.