पोलादपूर : वाकण धामणेचीवाडी येथे वणव्यात गुरांचा गोठा जळून खाक

By Raigad Times    13-Mar-2021
Total Views |
Poladpur fire 1_1 &n
 
वणवे रोखण्यास वनविभाग मात्र अयशस्वी
 
पोलादपूर : सर्वत्र आता उन्हाची झळ सुरू झाली असून सुकलेला पालापाचोळा सुकलेले गवत याला वणवा लागून अनेक ठिकाणी वनसंपत्ती धोक्यात येत आहे व याचा फटका वन्यजीव व स्थानिक नागरिकांना देखील होत आहे. रविवारी रात्री पोलादपूर तालुक्यातील वाकण धामणेची वाडी येथे वनव्यामध्ये गुरांचा गोठा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

Poladpur fire 2_1 &n 
 
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या वाकण धामणेचीवाडी येथे रविवारी रात्रीच्या सुमारास वनवा लागला होता व वनवा इतका भीषण इतकी होती की तेथील रहिवासी तुकाराम सखाराम गावडे यांचा गुरांचा गोठा वणव्यामध्ये जळून खाक झाला आहे.यामध्ये 1500 कौले, उपयोगी वस्तू ,शेतीसाठी लागणारी अवजारे यासह इतर छोट्या-मोठ्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्याची साधने स्पष्ट झाल्याने शेतकरी उघड्यावर पडला आहे.
 
Poladpur fire 3_1 &n
 
या घटनेनंतर वाकण येथील तलाठी बनसोडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व जवळपास 95 हजारांचे नुकसान या वणव्यांमुळे गोठ्याचे झालेले आहे. यावेळी पोलीस पाटील साने, ग्रामपंचायत लेखनिक पांडुरंग साने, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद साने, सुंदर गावडे, निवृत्ती कदम उपस्थित होते.