रायगड : जन्मदात्या पित्याने आधी मुलीचा गळा चिरला...नंतर शीर धडापासून अलग करत फेकले नदीत!

By Raigad Times    06-Feb-2021
Total Views |
Murder_Khalapur_1 &n
 
  • निर्घृण हत्येच्या घटनेने खालापूर तालुका हादरला
  • पाताळगंगा नदीत धड सापडले, शीर शोधण्याचे काम सुरु
  • बिहार येथून खोपोलीत फिरायला आले होते कुटुंब
संदीप ओव्हाळ/खोपोली । जन्मदात्या पित्यानेच अल्पवयीन मुलीची गळा चिरुन हत्या केल्यानंतर तिचे शीर धडापासून अलग करत, ते पाताळगंगा नदीत फेकल्याची धक्कादायक घटना खालापूर तालुक्यातील हाळ गावानजीक घडली. या घटनेने खालापूर तालुका हादरला आहे. घटनास्थळी पोलिसांना धडापासूनचा अर्धा मृतदेह सापडला असून, मुंडके शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
 
शुक्रवारी (5 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास हाळ गावानजीक म्हाडा कॉलनीच्या मागील परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय सुदर्शन सिंह (वय 50, रा. कुद्रा, जि.कैमुर, भबुआ, बिहार) हा त्याची पत्नी आणि दोन मुलींसह चार दिवसांपूर्वी खोपोली शहरातील एका लॉजवर रहायला आला होता. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अजय पत्नीला मुुलीचे भूत उतरविण्याचा बहाणा सांगत पत्नीसह मुलींना घेऊन लॉजबाहेर पडला.

Murder_Khalapur_1 &n 
 
हाळ गावानजीक म्हाडा कॉलनीच्या मागे त्यांना घेऊन गेला. तेथे गेल्यानंतर अजयने मनातील राग व्यक्त करीत 14 वर्षीय खुशीला चाकूने भोसकले आणि तिचे शीर धडावेगळे करुन पाताळगंगा नदीत फेकले. या घटनेने प्रचंड घाबरलेल्या प्रत्यक्ष साक्षीदार खुशीची आई आणि बहिणीने घटनास्थळावरुन हाळ गावात पळ काढला. अजयच्या 12 वर्षीय मुलीने आपल्या बापाने बहिणीचा खून केल्याची माहिती गावकर्‍यांना दिली.
 
Murder_Khalapur_1 &n 
 
या घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते, महिला पोलीस उपनिरीक्षक अंबिका अंधारे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. याठिकाणी पोलिसांना खुशीचे धड नदीत सापडले. तर आज (6 फेब्रुवारी) नदीपात्रात शीर शोधण्यासाठी अपघातग्रस्त संस्थेच्या सदस्यांची मदत घेण्यात आली. अजूनही नदीपात्रात मुंडके शोधण्याचे काम सुरु आहे.
 
दरम्यान, मुलीची निर्घृण हत्या केल्यानंतर अजय सिंह हा फरार झाला असनू, त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथक बिहार येथे गेले असल्याची माहिती मिळाली आहे.
-----------------------------------------------------------
Murder_Khalapur_1 &n 
हत्या झालेल्या मुलीच्या मृतदेहापैकी धड सापडले असून शवविच्छेदनासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे. मुलीची आई आणि बहिण यांचे जाबजबाब व पंचनामा सुरु आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असला तरी त्याचे लोकेशन ट्रेस झाले आहे. लवकरच त्याला ताब्यात घेऊ खुनाचा तपास करण्यात येईल.
- अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, खालापूर
-----------------------------------------------------------