वर्षातील पहिल्या अंगारक संकष्ट चतुर्थीला पालीचे बल्लाळेश्वर मंदिर राहणार बंद

By Raigad Times    28-Feb-2021
Total Views |
pali ballaleshwar temple_
 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देवस्थान ट्रस्टचा निर्णय
 
सुधागड-पाली : वर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी 2 मार्चला आहे. यावेळी हजारो भाविक पालीतील अष्टविनायक गणपती बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या दिवशी मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. त्यामुळे कोणीही अंगारकीला मंदिरात येऊ नये, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.धनंजय धारप यांनी आज (28 फेब्रुवारी) केले आहे.
 
अष्टविनायक तिर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक तिर्थस्थळ असलेल्या पाली बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने याआधीच जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार कोरोना काळात विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करणार्‍यांनाच बाप्पाचे दर्शन दिले जात आहे. मात्र अंगारक संकष्ट चतुर्थीला भाविकांची अलोट गर्दी होण्याची शक्यता आहे.
 
या पार्श्वभूमीवर पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार व देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.