सुधागडमध्ये रायगड जिल्हा अजिंक्य चषक कबड्डी स्पर्धेचा थरार

By Raigad Times    25-Feb-2021
Total Views |
Rajmata Jijau Kalamboli_1
 
किशोर गट मुली राजमाता जिजाऊ कळंबोली संघ तर किशोर गट मुले जय बजरंग रोहा संघ अव्वल
 
पाली/वाघोशी । रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने सुधागड तालुक्यातील नांदगाव हायस्कुल च्या प्रांगणात रायगड जिल्हा अजिंक्य चषक कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. श्री काळभैरव क्रीडा मंडळ नांदगाव मुंबई ठाणे यांच्यातर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत किशोर गट मुली राजमाता जिजाऊ कळंबोली संघ तर किशोर गट मुले जय बजरंग रोहा संघ अव्वल ठरले. या स्पर्धेत किशोर गट मुली 16 संघ, किशोर गट मुले 48 संघ असे एकूण 64 संघांनी सहभाग घेतला होता.

Jai Bajrang Roha_1 & 
 
यामधून किशोर गट मुली यांमध्ये राजमाता जिजाऊ कळंबोली या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक कर्नाळा स्पोर्ट पनवेल, तृतीय क्रमांक भालचंद्र उरण, चतुर्थ क्रमांक टाकादेवी मांडवा या संघांने पटकावले. तसेच किशोर गट मुले यांमध्ये जय बजरंग रोहा संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक बालयुवक पेझारी, तृतीय क्रमांक नवजीवन क्रीडा मंडल पेझारी, चतुर्थ क्रमांक जय हनुमान क्रीडा मंडळ उचेडे पेण या संघाने पटकावले. प्रथम क्रमांक विजेत्या संघांना कै.कु.अभिषेक बोरकर फिरता स्मृती चषक सन्मानित करण्यात आले.
 
स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमाला रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष सुरेश खैरे, हिराचंद पाटील, गजानन मोकल, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन सहकार्यवाह जे.जे.पाटील, संजय मोकल, छत्रपती पुरस्कार प्राप्त सूर्यकांत ठाकूर, प्रमोद म्हात्रे, प्रो कबड्डी पंच सुहास पाटील, आंतरराष्ट्रीय पंच रविंद्र म्हात्रे, नांदगाव भूषण व उद्योजक दीपक मेहता, उद्योजक ठाणे चिमाजी कोकाटे, अरिफ मनियार, माजी उपसरपंच नरेश खाडे, नांदगाव सरपंच सोनल ठकोरे, सरपंच उमेश यादव, सुधागड तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष राजेंद्र राऊत, सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष गणपत सितापराव, पेण सभापती गायकर, माजी सभापती साक्षी दिघे, जीवन साजेकर, भगवान शिंदे आदींसह नांदगाव पंचक्रोशीसह जिल्ह्यातील कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.