पॉलिशच्या बहाण्याने महिलेचे दागिने केले लंपास

By Raigad Times    24-Feb-2021
Total Views |
Untitled-1_1  H 
 
तळोजा परिसरातील घटना; गुन्हा दाखल
 
पनवेल । ‘दागिने पॉलिश करुन देतो’ अशी बतावणी करत, भामट्यांनी एका महिलेचे 40 हजार रुपये किंमतीचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची घटना तालुक्यातील तळोजा परिसरात घडली आहे.
 
तळोजा परिसरात राहणार्‍या दर्शना पाटील (34) यांच्याकडे काही भामटे गेले व तुमच्याकडे असलेले दागिने चमकवून देतो असे सांगून त्यांच्याकडील दागिने स्टीलच्या डब्ब्यात टाकण्यास सांगितले. डब्ब्यात पाणी हळद, मीठ टाकून 15 मिनिटानंतर डब्बा उघडण्यास सांगून हातचलाखीने सदर दागिने लंपास करून ते तेथून निघून गेले.
 
15 मिनिटांनी दर्शना पाटील यांनी डब्बा उघडला असता त्यांना दागिने आढळून आले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.