रोहा येथील कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण

By Raigad Times    21-Feb-2021
Total Views |
Kundalika River Conservat
 
  • नद्यांचे संवर्धन होणे गरजेचे - खा. शरद पवार
  • कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही, काळजी घेण्याचे आवाहन
रोहा : नद्या समाजाला प्रेरणा देतात त्याच आपण उद्ध्वस्त करीत आहोत. देशात, राज्यात अनेक नद्या आहेत, नदीकाठी संस्कृती वाढत असते, जीवनात प्रचंड परिणाम करणाऱ्या नद्या दूषित करण्याचे काम आपण करत आहोत. असे असताना रोह्यातील कुंडलिका नदीचे संवर्धन आज केले जात आहे, कुंडलिका स्वच्छता करण्याचा संकल्प आज रोहेकरांनी केला आहे. त्यामुळे रोह्यातील मान्यवरांची जननीला दुर्लक्षित केली; पण आज ती स्वच्छ केली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मांडले.
 
रोहा येथे नगर पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या 40 कोटी कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण आज (२१ फेब्रुवारी) पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खा. शरद पवार यांनी नदी प्रदूषणाच्या मुद्द्याला हात घालत चिंता व्यक्त केली. नद्या ही आपली संस्कृती असल्याचे सूचक विधान करीत नद्या प्रदूषणविरहीत राहिल्या पाहिजेत असे आवाहन करीत रोहेकरांनी कुंडलिका नदीच्या केलेल्या संवर्धनाचे कौतुक केले.

Kundalika River Conservat 
 
कोरोना गेला अस वाटत असताना पुन्हा त्याने डोके वर काढले आहे. याबद्दल चिंता व्यक्त करीत खासदार शरद पवार यांनी काळजी घेण्याचे आवाहन खा. शरद पवार यांनी केले. यावेळी कोकणाच्या विकासाच्या मुद्द्याला हात घालत औद्योगिक वसाहत, फलोत्पादन, पर्यटन आणि मत्स्य व्यवसायावर आधारीत कोकणचा विकास साधण्याची कल्पना मांडली. रायगड हा विकासला आणि पर्यटनाला चालना देणारा जिल्हा असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
 
यावेळी आमदार अनिकेत तटकरे, राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, विजयराव मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर, रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेश कोलाटकर, गटनेते महेंद्र गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.