अलिबाग : रस्त्यांवर अपघाताची संख्या रोज वाढत आहे. सुरक्षा आणि बेदरकार वाहने चालवल्यामुळे अनेकदा अपघात होतात. तुम्हाला जर सुखरूप प्रवास करायचा असेल, तुमच्या बायको मुलांसह सुंदर आयुष्य जगायचे असेल तर , पोलिसांनी सांगितले 10 महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा
1. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा.
2. चारचाकी वाहन चालविताना सिट बेल्टचा वापर करावा.
3. वेग मर्यादेपेक्षा अतिवेगात वाहन चालवू नये.
4. मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये.
5. वाहन चालविताना लेन कटींग करु नये.
6. पादचार्यांनी नेहमी फुटपाथचा वापर करावा.
7. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करु नये.
8. रस्त्यावर धोकादायकरित्या वाहन चालवू नये.
9. पादचार्यांनी झेब्राक्रॉसिंगच्या ठिकाणी रस्ता ओलांडावा.
10. वाहन चालवितांना पादचार्यांना प्राधान्य द्यावा.