file photo
अलिबाग | मिस टीन महाराष्ट्र २०२१ या स्पर्धेचे आयोजन अलिबाग येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेती स्पर्धक ही टिन इंडिया २०२१ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र् राज्याचे प्रतिनीधीत्व करु शकणार आहे. तालुक्यातील चोंढीजवळील ट्रॉपीकाना रिसॉर्ट येथे ही स्पर्धा १० व ११ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यांत आली असल्याची माहिती आयोजक कविता प्रविण ठाकूर यांनी दिली आहे.
मिस टीन महाराष्ट्र २०२१ हि किशोरवयीन मुलींसाठीची सौंदर्यस्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मुलींना अर्ज करण्यासाठी आमंत्रीत केले गेले आहे. स्पर्धकांमधील १० स्पर्धक अनेक फेर्यांनंतर मिस टीन महाराष्ट्र २०२१ साठी पात्र होतील. त्यानंतर स्पर्धकांची बुध्दीमत्ता, ग्रेस, मानवता व सामाजिक कौषल्य याव्दारे स्पर्धकांची चाचणी घेवून अंतिम विजेती जाहिर केली जाईल.
यापूर्वी अलिबाग येथील अपूर्वा प्रविण ठाकूर हिने मिस टीन इंडिया व मिस टीन युनीव्हर्स २०१९ हा पुरस्कार जिंकून अलिबागचे नाव जागतीक स्तरावर नेले होते. अलिबाग पर्यटन दृष्ट्या प्रसिध्द आहे. या सौदर्य स्पर्धेमुळे गुणवंत किशोरवयीन मुलींना जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी निवड होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, सिनेकलाकार देवदत्त नागे व इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
स्पर्धेच्या स्पर्धकांसाठी प्रत्येक ७०० रुपये इतकी नाममात्र प्रवेश फि असणार असून, स्पर्धक महाराष्ट्र राज्याची निवासी आवष्यक असून, तिच्याकडे भारतीय पासपोर्ट असणे गरजेचे असणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ७७९८६६८५०१ या वव्हॉट्सऍप/मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.