महाड शहरात घरफोडी; दागिने चोरुन चोर पसार

By Raigad Times    15-Feb-2021
Total Views |
 House Breaking _1 &n
 
अलिबाग । महाड शहरातील काकरतळे बुटाला हॉल परिसरातील घर फोडून चोराने 55 हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु आहे.
 
महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत 13 ते 14 फेब्रुवारीदरम्यान पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी हे पत्नीसह बाहेर गेले होते. दोघेही घरात नाही, याचा गैरफायदा घेत अज्ञात चोराने लोखंडी वस्तूच्या सहाय्याने कडी कोयंडा तोडूत घरात प्रवेश केला आणि सोन्याचे मंगळसूत्र, एक जोड कानातले, अंगठी व इतर असा 55 हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करुन चोरुन नेला.
 
याप्रकरणी फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार एस.जी.खाडये या करीत आहेत.