तळा नगरपंचायत निवडणुकीत भाजप सर्व जागा स्वबळावर लढवणार

By Raigad Times    14-Feb-2021
Total Views |
BJP_1  H x W: 0 
 
कार्यकर्त्यांच्या सभेत एकमताने निर्णय
 
विराज टिळक/तळा : तळा नगरपंचायत निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय भाजप कार्यकारिणीच्या सभेत एकमताने घेण्यात आला आहे. तळा शहरातील मराठा समाज सभागृहात शनिवारी (१३ फेब्रुवारी) ही सभा पार पडली.
 
या सभेच्या अध्येक्षस्थानी तळा तालुक्याचे संपर्क प्रमुख बिपीन म्हामुणकर हे होते तसेच यावेळी रवि मुंढे, जिल्हा महिला अध्यक्ष हेमा मानकर, तालुका महिला अध्यक्ष राजेश्री सोलम, जिल्हा महिला चिटणीस घाग, मा. नगराध्यक्षा रश्मा मुंढे, शहर अध्यक्ष सुधीर तळकर, सरचिटणीस रमेश लोखंडे, सुरेश शिंदे, ओबीसी जिल्हा कार्यकारिणी सदस्य गोविंद कीर्तने, रितेश मुंढे, सुरेश मुंढे, ज्ञानेश्वर घरटकर, शिगवण, तालुका उपाध्येक्ष मंगेश सावंत, जयेंद्र पाशिलकर, जिल्हा युवा चिटणीस प्रशांत सकपाळ, प्रवीण भौड, सुनील वाढ आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी जेष्ठ पत्रकार नारायणराव मेकडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

bjp_1  H x W: 0 
 
तळा तालुक्यात काही वर्षांपूर्वी भाजप पक्षाची वेगळीच ताकद होती. पण काही वर्षांनी तळा तालुक्यात ही ताकद काहीशी कमी झाली आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाने मुसंडी मारली. आता पुन्हा तळा तालुक्यात कमळाने उभारी घ्यायला सुरुवात केली आहे. आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत येणाऱ्या निवडणुकीची रणनीती आखण्यात आली. या सभेत नगर पंचायत निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. येणाऱ्या निवडणुकीत भाजप कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास बिपीन म्हामुणकर यांनी कार्यकर्त्यांना या वेळेस दिला. तळा शहराचा विकास हा भाजपच्या माध्यमातूनच होणार, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
काही योजना अशा आहेत कि त्या सामान्य जनतेपर्यंत पोहचत नाहीत. त्या सर्व योजना घराघरात नेऊन त्यांचा नागरिकांना लाभ करून द्या, असे तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तळे शहरात खूप विकासाची कामे अपूर्ण आहेत, तालुक्यातील बाजारपेठ मंदावली आहे. ही बाजारपेठ पुन्हा कशी फुलेल आणि स्थानिकांना कसा रोजगार निर्माण होईल या सर्व गोष्टींचा विचार करून पक्षामार्फत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं काम मी हाती घेतलं आहे, त्या संदर्भात वरिष्ठांशी बोलणं सुरू झालं असून लवकरच हे काम मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे ऍड. निलेश रतवाडकर म्हणाले.
 
तर तळा तालुक्यात जेव्हा मी मुंबईतून आलो तेव्हा काहीशे कार्यकर्ते शिवसेनेत होते आणि शिवसेना वाढवण्याचं काम मी तळागाळात जाऊन रात्रीचा दिवस करून मी केलं. त्याचप्रमाणे भाजपने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला मी कधीच तडा जाऊन न देता संपूर्ण मतदार संघात भाजप वाढीसाठी कार्य हाती घेतलं आहे, काही दिवसातच भाजप पक्ष श्रीवर्धन मतदार संघात नंबर एकचा पक्ष होईल, असा विश्वास रवि मुंढे यांनी व्यक्त केला.