अलिबाग - रायगड जिल्हयातील अलिबाग तालुक्या मधील चोंढी जवळील ट्रॉपीकाना रिसॉर्ट येथे 11 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र टिन इंडिया 2021 ची स्पर्धा रायगड मधील दक्षता देसाई हिने जिंकली आहे.
मिस टीन इंडिया 2021 साठी दक्षता देसाई ही महाराष्ट्र राज्याचे प्रतिनीधीत्व राष्ट्रीय पातळीवर करेल. महाराष्ट्र राज्यातील 34 युवतींनी या स्पर्धमध्ये भाग घेतला होता. त्या पैकी 8 जणींची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. या नउ जणींमधून दक्षता देसाई ही टीन इंडिया महाराष्ट्र ठरलेली आहे. तर दुसरा क्रमांक नेहा पाटील व तिसरा क्रमांक तलीशा चौगुले यांनी पटकावला आहे. महाराष्ट्र मिस टीन 2021 स्पर्धेचे उद्घाटन मांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी धर्मराज सोनके व काँग्रेसचे जिल्हा उपाध्ध्यक्ष ऍड.प्रविण ठाकूर यांच्या हस्ते करण्यांत आला.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सुनील थळे, रविंद्र उर्फ कामा ठाकूर, अक्षया नाईक, रविनाना ठाकूर इ.उपस्थित होते. मिस इंडिया 2018 अपूर्वा चव्हाण, मिस्टर स्टार युनिव्हर्स सागर आमले व आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अमित वैद्य यांनी तज्ञ परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्यांचे कार्यक्रमाच्या आयोजक कविता प्रविण ठाकूर यांनी अभिनंदन केले असून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये या स्पर्धेतील विजेत्या रायगडचे नाव रोशन करतील अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.