संस्कार म्हात्रे ठरला सर्वोत्कृष्ट फलंदाज

08 Dec 2021 15:36:51
sanskar matre_1 &nbs
 
 
उरण | कोलकता येथे संपन्न झालेल्या १९ वर्षांखालील ऑल इंडिया डुअर्स कप २०-२० स्पर्धे त रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील डोंगरीचा सुपूत्र तथा द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे क्रीडा विभागप्रमुख भरत म्हात्रे यांचा मुलगा संस्कार म्हात्रे याने दमदार कामगिरी करत सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार पटकावला आहे.
 
 
ही स्पर्धा ही २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर रोजी कोलकाता येथे पार पडली. ५ राज्यांतून १६ संघ सहभागी झाले होते. त्यात फोर्टव्हीव मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व करत संस्कार म्हात्रेने पहिल्याच सामन्यात पॉल चॅटर्जी कोलकाता संघाविरुद्ध २४ चेंडूत धडाकेबाज ६२ धावा काढल्या आणि गोलंदाजी करताना ४ षटकांत १३ धावा देऊन २ गडी बाद करत सामनावीर पुरस्कार मिळवला.
 
  
त्यानंतर आसाम आणि दिल्ली संघा विरुद्धच्या सामन्यातदेखील १३६ च्या स्ट्राईक रेटने ६२ चेंडू मध्ये ९० धावा करीत गोलंदाजीत एकूण ८ षटकात ३२ धावांच्या बदल्यात ३ गडी बाद केले. संस्कार म्हात्रेच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल त्याला या स्पर्धे तील सर्वोत्कृष्ट फलंदाज पुरस्कार मिळाला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0