पाली बस स्थानकाजवळील मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोघे ताब्यात

By Raigad Times    31-Dec-2021
Total Views |
mataka
 
 
पाली/बेणसे (धम्मशील सावंत) । सुधागड तालुक्यातील पाली बस स्थानकाजवळील गल्लीत सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पाली पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत 1 लाख 67 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल, रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
 
पोलीस कॉन्स्टेबल अतुल चंदनशिवे व पोलीस नाईक शेडगे हे बीट मार्शल पेट्रोलिंग ड्युटीकरिता हजर होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांना या ठिकाणी अवैध मटका धंदा सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाने चंदनशिवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे, पोलीस नाईक म्हात्रे व शेडगे यांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक पावती बुक, पावत्या इतर साहित्य रोख रक्कम व स्कुटी मोटारसायकल मिळून आल्या आहेत.