महाड : महिला सरपंचाच्या हत्या प्रकरणी एकजण गजाआड

हत्येआधी बलात्कार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न

By Raigad Times    30-Dec-2021
Total Views |
police mahad_1
 
 
महाड | तालुक्यातील आदीस्ते गावच्या महिला सरपंचंची हत्या करणाऱ्या इसमाला रायगड गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सादर इसमाला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 4 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
 
 
मिनाक्षी मनोहर खिडबिडे (वय 48) यांचा सोमवारी अज्ञात इसमाने निघृण खुन केल्याची घटना घडली होती. मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्याने बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महाड पोलीस याबाबत तपास केल्यानंतर या घटनेला दुजोरा मिळाला आहे. रायगड गुन्हे अन्वेषण शाखेने या खुनाचा छडा लावला असून एका इसमाला ताब्यात घेतले आहे.
तुडील भेलोशी रस्त्यालगत आदीस्ते गावच्या उबटआळी रस्त्यालगत सोमवारी दुपारी जंगलात सदर महिला फाटी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी हि घटना घडली होती.
 
 
गावातील एक तरुण महाडकडे येत असताना रस्त्यालगत फाट्याची भारी पडलेली दिसली. मात्र आजूबाजूला कोणीही दिसले नाही म्हणून सदर तरुणाने परीसरात शोध घेतला असता रस्त्यालगत जंगल भागचात सदर महिला जखमी अवस्थेत दिसून आली. त्यानंतर त्या तरुणाने पोलिसांना माहिती दिली. अज्ञात इसमाने डोक्यात फाटा मारून त्यांचा खुन केला करण्यात आल्याचे दिसत होते.
 
 
महाडचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी तपासाची सूत्र गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिल्यानंतर तपासला वेग आला. याप्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे.