रायगड जिल्हा परिषद शाळेत गोफण प्रशिक्षण

03 Dec 2021 15:20:07
poladur prashikshan_1&nb
 
पोलादपूर | भारतीय गोफण फेडरेशनच्या माध्यमातून राष्ट्रीय गोफणपटू आणि प्रशिक्षक ओंकार महादेव उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घागरकोंड येथील रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिले गोफण प्रशिक्षण शिबीर पार पडले. गोफण या खेळाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी फेडेरेशनने ग्रामीण भागापासून सुरुवात केली आहे.
 
पोलादपूर या अतिदुर्गम ग्रामीण भागातील घागरकोंड शाळेपासून या प्रशिक्षण वर्गाची सुरुवात झाली आहे. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनीदेखील आवर्जून याप्रशिक्षण शिबिरात भाग घेतला. १७ वर्षे वयोगटाखालील खेळाडूंचा गट आणि प्रौढ गटासाठी वयाची मर्यादा नसल्यामुळे सर्व इच्छूक खेळाडू या स्पर्धेत भाग घेतला. हा खेळ सांघिक आणि वैयिेकरित्या देखील खेळला जातो. पारंपारिक परंतु क्रीडा क्षेत्रात गोफण नव्याने उदयास आल्यामुळे सर्व स्थरावर याची दखल घेतली जात आहे.
 
गोफण या ऐतिहासिक वारसा असलेल्या खेळाला आज आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारचा दर्जा मिळाला आहे. शालेय क्रीडा प्रकारात समावेश देखील करून घेण्याचे प्रयत्न फेडरेशनमार्फत सुरू आहेत. लवकरच जिल्हा, राज्य आणि राष्ट्र स्थरीय स्पधारचे आयोजनदेखील फेडरेशनमार्फत केले जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0