मदतीचा हात, सुकर झाली पायवाट

28 Dec 2021 15:11:45
rode_1
 
ऍड. रामचंद्र मेंदाडकर यांचे मोलाचे सहकार्य
 
दिघी (गणेश प्रभाळे)| श्रीवर्धन तालुक्यातील कापोली येथील उत्कर्षनगरमध्ये नव्याने लोकवस्ती तयार होत आहे. मात्र, या वस्तीत जाणारी, मोठ्या प्रमाणात दुरवस्थेत असलेली अनेक कुटुंबांची पायवाट आता रामचंद्र मेंदाडकर यांच्या मदतीने सुकर झाली आहे.
 
 
कापोली येथील उत्कर्ष नगर येथे आजूबाजूला वीसहुन अधिक कुटुंब स्थायिक आहेत. नव्याने स्थित होत असलेल्या या कुटुंबांना सुरुवातीपासून अनेक सुविधांची गरज भासू लागली. त्यामुळे कोणत्याही शासन निधीच्या प्रतीक्षेत न राहता लोकसहभागातून मदत मिळवण्यासाठी येथील रहिवासी उदय कळस यांनी पुढाकार घेतला. ऍड. रामचंद्र मेंदाडकर या मित्राच्या मदतीने येथील १५५ मीटरची पायवाट सिमेंट कॉंक्रीटने तयार करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
 
 
या रस्त्याचे रजनी माऊली मेंदाडकर नामकरण करण्यात आले. यावेळी दिघी सागरी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला दामोदर दिघीकर, संदिप चव्हाण, दत्तात्रेय पांढरकामे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका सचिव सुमित सावंत, धवल तवसाळकर, श्रीकांत शेलार, सुरेश पांढरकामे, संतोष रेळेकर, वैभव तोडणकर, संतोष शिलकर, अमोल चांदोरकर, मनोज गोरेगावकर, कृष्णा जाधव, जितेंद्र भायदे स्वप्नाली कळस, आदी मान्यवरांनी उपस्थित राहून या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0