महाड तालुक्यात महिला सरपंचाची निर्घृण हत्या;

28 Dec 2021 13:34:30
mahilecha khun_1 
 
महाड विशेष प्रतिनिधी
 
महाड | महाड तालुक्यातील आदीस्ते गावच्या महिला सरपंच मिनाक्षी मनोहर खिडबिडे वय 48 यांचा कोणीतरी अज्ञात इसमाने निघृण खुन केल्याची घटना घडली आहे. मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्याने बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महाड पोलीस याबाबत तपास करीत आहेत. तुडील भेलोशी रस्त्यालगत आदीस्ते गावच्या उबटआळी रस्त्यालगत सोमवारी दुपारी जंगलात सदर महिला फाटी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी हि घटना घडली आहे.
 
 
गावातील एक तरुण महाडकडे येत असताना रस्त्यालगत फाट्याची भारी पडलेली दिसली. मात्र आजूबाजूला कोणीही दिसले नाही म्हणून सदर तरुणाने परीसरात शोध घेतला असता रस्त्यालगत जंगल भागत सदर महिला जखमी अवस्थेत दिसून आली. त्यानंतर त्या तरुणाने पोलिसांना माहिती दिली. अज्ञात इसमाने डोक्यात फाटा मारून त्यांचा खुन केला असुन मृतदेह विवस्त्र असल्याने तिच्यावर अतिप्रसंग अगर बलात्काराचा संशय व्यक्त केला जात आहे. महाडचे पोलिस सहअधिक्षक, तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन तपास सुरु करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0