रायगड : कार-स्कुटीची धडक होऊन अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

पेण-खोपोली मार्गावरील आंबेगावजवळील दुर्घटना

By Raigad Times    27-Dec-2021
Total Views |
Accident_4
 
पेण (देवा पेरवी)। पेण-खोपोली मार्गावर आंबेगावनजीक भीषण अपघात झाला. कार आणि स्कुटीची धडक होऊन झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.

Accident_3
 
आज (27 डिसेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात अनंत कृष्णा दिवेकर (वय 67) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्यासोबत गाडीवर बसलेले त्यांचे भाऊ हरिभाऊ कृष्णा दिवेकर (वय 60) हे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोघेही पेण तालुक्यातील वरसईतील करोटी गावचे राहणारे आहेत.

Accident_1
 
पेण-खोपोली मार्गावरील आंबेगावनजीक त्यांच्या स्कुटीची आणि कारची धडक झाली. या अपघातात अनंत दिवेकर यांचा मृत्यू झाला. तर हरिभाऊ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते कल्पेश ठाकूर यांनी अपघातग्रस्तांना आपल्या रुग्णवाहिकेतून पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Accident_2