चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या

24 Dec 2021 15:22:36
khun_1
 
माणगाव | पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला लाथाबुक्याने,कोयत्याने व कुर्‍हाडीने मारहाण करून तिची हत्या केली.सदरील घटना माणगाव तालुक्यातील मुठवली आदिवासीवाडी येथे बुधवार दि.२२ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या पूर्वी फिर्यादी यांच्या राहते घरात घडली.सदर घटनेची फिर्याद गोविंद महादेव धाडवे रा.मुठवली तर्फे तळे ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.या घटनेतील आरोपी पतीला माणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
 
 
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,घटनेतील आरोपी पांडुरंग संत्या हिलम(वय-४५) रा.मुठवली आदिवासीवाडी ता.माणगाव यांनी त्याची पत्नी मयत लीला पांडुरंग हिलम (वय-३३) रा.मुठवली आदिवासीवाडी ता.माणगाव हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला लाथाबुक्याने कोयत्याने व कुर्‍हाडीने मारहाण करून लहानमोठ्या गंभीर स्वरूपाच्या दुखापती करून तिची हत्या केली. या घटनेची माहिती समजताच महाड तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त कार्यभार माणगाव श्री.तांबे यांनी घटनास्थळी भेट दिली.या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.२६६/२०२१ भादवि संहिता कलम ३०२ प्रमाणे करण्यात येऊन आरोपी पती पांडुरंग संत्या हिलम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा अधिक तपास महाड तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त कार्यभार माणगाव श्री.तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर हे करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0