खुशखबरः सिडकोकडून 5 हजार नवीन घरांची सोडत

नवी मुंबर्ईत नवे घर घेण्याची संधी

By Raigad Times    22-Dec-2021
Total Views |
cedco_1
 
 
नवी मुंबई । नवी मुंबईत घर घेणार्‍यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार असून सिडकोच्या पाच हजार घरांची सोडत निघणार आहे. ही सोडत 15 ते 26 जानेवारी दरम्यान काढली जाणार असल्याचे समजत आहे.
 
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन वर्षांतील 5 हजार घरांची नुकतीच घोषणा केली होती. नवीन वर्षाच्या प्रारंभी सिडको 5 हजार फ्लॅट्ससह गृहनिर्माण योजना सादर करणार आहे. या सदनिका नवी मुंबईतील घणसोली, द्रोणागिरी, खारघर, कळंबोली आणि तळोजा या पाच प्रमुख ठिकाणी असतील, ज्यामुळे रहिवाशांना अनेक सुविधा आणि उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल. सिडको नवी मुंबईतील 5 प्राइम लोकेशन्समध्ये नवीन वर्षाची ऑफर म्हणून 5,000 सदनिका लॉन्च करणार आहे.
 
यापूर्वी शिल्लक राहिलेली 900 घरांची विक्री पुढील वर्षांच्या प्रारंभी सुरू केली जाणार आहे. यामुळे सिडकोच्या तिजोरीत भर पडणार आहे. एथड श्रेणीतील सहभागी लाभार्थ्यांना 1.5 लाखाचे केंद्रीय सहाय्य आणि 1ङ राज्य सहाय्य मिळण्याचा हक्क आहे, तर ङखॠ लाभार्थी 2.67 लाखापर्यंत कर्ज सबसिडीचा लाभ घेऊ शकतात.